सडकअर्जुनी(अनिल मुनिश्वर):————–
दिनांक 21/06/2025 रोजीचे 15/35 ते 15/45 वा. दरम्यान फिर्यादी नामे अरविंद नारायण डोंगरवार वय 40 वर्षे रा. रेंगेपार/दल्ली यांच्या सडक/अर्जुनी येथील मुंगुलमारे पंपच्या समोर ठेवलेल्या मोटारसायकल च्या डिक्कीतून बॅगसह नगदी 20,000/- रुपये कुणीतरी अज्ञात चोरांनी चोरून नेले होते तसेच दिनांक 24/06/2025 रोजीचे 16/00 वा. ते 16/45 वा. दरम्यान फिर्यादी नामे धनराज देबीलाल रहांगडाले वय 57 वर्षे रा.गोंदिया यांच्या तहसिल कार्यालय येथे ठेवलेल्या चारचाकी वाहनाचे ड्रायव्हर सिटचे मागील बाजुचे काच तोडून गाडीचे मागील सिटवर असलेल्या बॅगमधून 60,000/-रु कुणीतरी अज्ञात चोरांनी चोरून नेल्याच्या तक्रारीवरून दोन्ही गुन्हे पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे नोंद करण्यात आले होते व सदर गुन्हयांच्या तपासात दिनांक 03/07/2025 रोजी सदर चोरी करणा-या टोळीतील दोन चोर नामे 1) रोडादासु रोडाबाबु दास वय 34 वर्षे 2) प्रविणकुमार मेकाला दास वय 25 वर्षे दोन्ही रा.बिरगुंटा ता.दारवरम जि.नेल्लोर, आंध्रप्रदेश यांना यवतमाळ येथून जेरबंद करून पोलीस स्टेशनला आणण्यात आले व त्यांचेकडून चोरीस गेलेला काही मुद्देमाल रोख रक्कम हस्तगत करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक गोरख भामरे गोंदिया, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार गणेश वनारे पो.स्टे. डुग्गीपार,पोउपनि प्रेमकुमार शेळके,पोहवा आशिष अग्निहोत्री,पोना महेंद्र सोनवाने,संजीव चकोले,निखील मेश्राम यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि प्रेमकुमार शेळके पो.स्टे.डुग्गीपार हे करत आहेत.









