पूर परिस्थिती बाबत संक्षिप्त माहिती दिनांक 07/07/2025 सायंकाळी 6.00 वा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनिश्वर):——————
1. आज दिनांक 07 जुलै रोजी भारतीय हवामान खात्याने गोंदिया जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे.
2. आज दि. 07/07/2025 ला सकाळी 7.00 वाजता जिवचंद यादोराव बिसेन रा. वडेगाव यांचा तिरोडा ला जात असताना सातोना रोडवर अतिवृष्टीमुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे करंजीचे झाड कोलमडून पडल्याने त्यांच्या मृत्यू झाल्या व एक मुलगा गंभीर जखमी आआहे. हे आपल्या मुलासह बाईकने तिरोडाकडे जात होते.
3. जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गोंदिया तालुक्यात 66.4 मिमी व तिरोडा तालुक्यात 72.9 मिमी (अतिवृष्टीची) नोंद करण्यात आली असून जिल्ह्यात एकूण 48.5 मिमी सरासरी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.
4. पुजारीटोला (कासा) ते मरारटोला तेडवा रस्ता पुरामुळे बाधित झालेला आहे. *(परंतु पर्यायी मार्ग उपलब्ध आहे.)*
5. तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील 02 घर अतिवृष्टीमुळे अंशतः पडले आहेत.
5. जिल्ह्याची परिस्थिती सामान्य आहे.

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें