सडक अर्जुनी(निखिल मुनिश्वर):————–
मराठा समाजाची ओबीसीमध्ये घुसखोरी थांबविण्यासह राज्य शासनाने काढलेला शंकास्पद शासन आदेश तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी तसेच विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने २१ सप्टेंबर रोजी गोंदिया येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी ओबीसी संघर्ष कृती समिती सडक अर्जुनीच्या वतीने दिनांक १६ सप्टेंबर रोजी तेजस्विनी लॉन येथे भव्य सभा घेण्यात आली.
या सभेत सकल ओबीसी समाज संघटना, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ, कुणबी समाज संघटना,तसेच एस.सी. – एस.टी. समाज संघटना सहभागी झाल्या. मोर्च्याच्या नियोजनासोबतच समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
सभेचे आयोजन ओबीसी संघर्ष कृती समिती सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष दिनेश हुकरे यांच्या मार्गदर्शनात माधव तरोने यांच्या अध्यक्षतेत भूमेश्वर शेन्डे (प्रदेश संघटन), तुकाराम राणे (सदस्य), जिल्हा उपाध्यक्ष अशोक लंजे, महिला अध्यक्ष पुष्पाताई खोटेले व रंजूताई भोई, पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष अविनाश काशिवार,नगरसेवक देवचंद तरोने, कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष अनिल मुनिश्वर, प्रल्हाद कोरे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकला डोंगरवार व भूमेश्वर पटले, मंजूताई डोंगरवार, सरपंच हर्ष मोदी, उपसरपंच मधुसुदन दोनोडे, माजी सरपंच दिनेश कोरे व सरिता तरोने, राजू पटले, राजेश कठाने, जितेंद्र शाहारे, अनिल बावणे बिर्ला गणवीर,एफ आर टी शहा,अरविंद मेंढे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
या प्रसंगी खालील ठराव संमत करण्यात आले : दिनांक २ व ३ सप्टेंबर २०२५ रोजीचा शासनादेश (GR) त्वरित परत घ्यावा., ओबीसीसह सर्व समाजाची जातनिहाय जनगणना तात्काळ करावी, 50% आरक्षणाची मर्यादा हटवून लोकसंख्येच्या मर्यादेत आरक्षण द्यावे,पोलीस, शिक्षणासह सर्व विभागांतील बिंदू नामावलीतील नियमबाह्य त्रुटी दूर करून ओबीसींना न्याय्य हक्काची हमी द्यावी.
या सर्व मागण्यांसाठी २१ सप्टेंबर रोजी गोंदियातील जयस्तंभ चौकातून सकल ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
