पहिल्यांदाच कुणबी समाज भवनात दिवाळी पहाट-25 कार्यक्रमाचे आयोजन,स्वानंद संगीताची सडक अर्जुनीवासियांना मेजवानी,हजारोच्या संख्येत प्रेक्षकांची उपस्थिती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(निखिल मुनीश्वर):————–

शहरातील कुणबी समाज भवन सडक अर्जुनी येथे 19 ऑक्टोबर ला पहाटे 5.30 वाजता स्वानंद संगीत अकॅडमीच्या माध्यमातून दिवाळी पहाट 2025 चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगरपंचायत चे नगराध्यक्ष तेजराम मडावी , शेषराव गिरेपुंजे,नंदू पर्वते, कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष अनिल मुनीश्वर, दादा फुंडे, सुनील तरोणे, किशोर तरोणे , दादा संग्रामें,लोकपाल गहाणे , चिंतामण तरोणे , खेमराज भेडारकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून दिवाळी पहाट कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
हिंदू समाजाच्या लौकिक असलेला दिवाळी सणानिमित्त परिसरातील नागरिक एकत्र येऊन सकारात्मक विचारांची देवाणघेवाण होण्याच्या उद्देशाने व दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वानंद संगीत अकादमीच्या माध्यमातून दिवाळी पहाट 2025 कार्यक्रमाची आयोजन ता. 19 ला पहाटे 5.30वाजता करण्यात आले होते.
यावेळी स्वरसम्राट रोहित तरोणे , निवेदक कुलदीप लांजेवार, त्यांचे सोबतीला अक्षय गेडाम , राहुल गहाणे, प्रवीण डुंबरे , विजेंद्र राठोड यांनी साथ दिली होती.
पहाटे अडीच तास , रंगलेली ही मैफिल लवकर संपूच नये, अशी प्रत्येकांची इच्छा होती. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली.
या झोपडीत माझ्या ,कानडा राजा पंढरीचा ,तुझ मागतो मी आता, उठी उठी गोपाळा, असे अनेक अभंग, भूपाळी, देशभक्ती गीत, हिंदी गझल , मराठी गीते आदी बहारदार गाण्यांचा सुर संगम मैफिलीने रंगत आली होती. मित्र वनव्या मध्ये गारव्यासारखा… या गीताने तर अक्षरशः प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणले होते…सकाळच्या सुंदर शांत व निरागस वातावरणात, बहारदार स्वानंद संगीत अकॅडमीची दिवाळी पहाट या कार्यक्रमाला बहार आली होती.
त्यांच्या अनेक गाण्यांना प्रेक्षकांनी दाद देऊन टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता. दरवर्षी अशीच दिवाळी पहाटचे आयोजन सडक अर्जुनी शहरात व्हावेत, अशी प्रत्येकांची इच्छा होती. यावेळी शहरातील, परिसरातील हजारो नागरिक दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते. दिवाळी पहाट कार्यक्रम पुन्हा अजून पुढे चालावे, यासाठी प्रेक्षकांनी आग्रह केला होता, मात्र वेळेच्या भान ठेवून साडेसात वाजता प्रार्थना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश मुनीश्वर , शरद रहिले , सौ.अंजली मुनीश्वर,सौ. वैशाली गिऱ्हेपुंजे,प्रल्हाद कोरे ,ओमप्रकाश टेंभुर्नी,बन्सी ब्राह्मणकर , प्रमिला कोरे, गुणवंत कठाने, सचिन फुंडे, सुमेधा मुनीश्वर ,तेजूबापू खोटेले, दिनेश हुकरे , जियालाल भगत आदींनी सहकार्य केले. संचालन करून आभार कुलदीप लांजेवार यांनी मानले.

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें