सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):—————
नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्मांतरण केले. ते परिवर्तन आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या माध्यमातून दिसणे गरजेचे आहे. आज घडीला बौद्ध समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून येत आहे हे निश्चित खरं आहे. परंतु यापेक्षा
अधिक चांगला बदल घडवून आणायचा असेल तर बौद्ध समाज बांधवांनी पंचशिलाचे पालन करणे गरजेचे आहे . असे प्रतिपादन डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.
संबोधी बौद्ध विहार समिती सडक अर्जुनीच्या वतीने 14 ऑक्टोंबर 2025 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन संबोधी बौद्ध विहाराच्या प्रांगणात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्त बुद्ध विहारातील ध्वजारोहण शिक्षक हिरालाल शहारे यांच्या हस्ते करण्यात आले. तर स्थानिक दुर्गा चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला रजनीश पंचभाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर
शहरातील विविध वार्डांमध्ये सकाळी ध्वजारोहण करून बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डातून धम्म रॅली चा शुभारंभ करण्यात आला असून रॅलीचे समापन संबोधी बौद्ध विहाराच्या प्रांगणात करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सुगत चंद्रिकापुरे भंडारा-गोंदिया लोकसभा संघटक शिवसेना यांच्या हस्ते, पंचायत समिती सदस्य अल्लाउद्दीन राजानी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंचावर प्रामुख्याने अर्जुनीचे नगराध्यक्ष तेजराम मडावी नगरपंचायत सभापती शशिकलाताई टेंभुर्णे , नगरसेवक देवचंद तरोने, असलेस अंबादे, महेंद्र वंजारी, अंकित भेंडारकर, गोपीचंद खेडकर, नगरसेविका दीक्षाताई भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रोशन बडोले, शिक्षक विलास कोटांगले, अनिल मुनिश्वर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रल्हाद कोरे, नगरपंचायत चे पदाधिकारी व इतर प्रतिष्ठित मान्यवरांचे उपस्थितीत होते. रात्री 9 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात बुद्ध व भीम गीतावर आधारित एकल नृत्य, समूह नृत्य, बुद्ध व भीम गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार बिरला गणवीर तर आभार राहुल गणवीर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी ते करता विहार समितीचे अध्यक्ष विदेश टेंभुर्णे, उपाध्यक्ष रंजीता मेश्राम, सचिव भाग्यवानकुमार शहारे, कोषाध्यक्ष रूपचंद खोब्रागडे, सहसचिव शहारे, व समितीच्या इतर सदस्यांनी सहकार्य केले.
