सडक अर्जुनी (निखिल मुनिश्वर):————-
येथील पंचायत समिती समोरील कुणबी समाज भवन परिसरात कुंनबी समाजाचा कोजागिरी व स्नेह भोजन व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोज बुधवार ला सायंकाळी चार वाजता पासून दहा वाजेपर्यंत कुणबी समाज संघटनेतर्फे कुणबी समाज बांधवा च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाला अनेक कुणबी समाजातील मान्यवर उपस्थित राहणार असून तालुक्यातील समस्त कुणबी समाज बांधव भगिनींनी सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष अनिल मुनिश्वर व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे
