सडक अर्जुनी (अनिल मुनिश्वर):————–सशक्त नारी सुदृढ परिवार अभियान अंतर्गत दिनांक २३/०९/२०२५ ला ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व महिलांची सर्व प्रकाराच्या रोगाची तपासणी, निदान करून तज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जाणार. तरी सडक अर्जुनी तालुका वासियांना ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत तूरकर यांचे आवाहन आहे की सर्व महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून शिबिराचा लाभ घ्यावा.
