अवैध धंदयावर डुग्गीपार पोलीसांची धडक कारवाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडकअर्जुनी(अनिल मुनिश्वर):————-डुग्गीपार पोलीस स्टेशन अतंर्गत कायक्षेत्रातील अवैध धंदे समुळ नायनाट करुन अवैध धंदे करणा-यांवर वचक बसावा याकरीता पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दररोज गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करण्यात येत असून दिनांक 06/07/2025 रोजी चे 15/40 वा. गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या खबरेबरून मौजा सडक/अर्जुनी येथील स्मशानभुमी येथे सार्वजनीक ठिकाणी 52 तासपत्तीवर जुगाराचा खेळ खेळतांना मिळून आलेल्या 5 आरोपी नामे 1) उमेश भाऊराव कोहळे वय 32 वर्षे 2) दिग्रेस बळीराम टेंभुरकर वय 37 वर्षे 3) करण दिलीप कुलभजे वय 28 वर्षे 4) फिरोज नईमखॉ पठाण वय 37 वर्षे 5) नौशाद अन्वरअली सैय्यद वय 37 वर्षे सर्व रा.सडक/अर्जुनी यांना एक चारचाकी वाहन, एक मोटारसायकल व नगदी अशा एकुण 12,31,120/- रु. चे मुद्देमालासह पकडण्यात आले असून त्यांचेवर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा.गोरख भामरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री.विवेक पाटील सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री.गणेश वनारे पो.स्टे. डुग्गीपार, पोहवा आशिष अग्निहोत्री, पोना महेंद्र सोनवाने, संजीव चकोले, उद्देभान रुखमोडे, मपोशि मनिषा कोचे यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास पोहवा दिपक खोटेले पो.स्टे. डुग्गीपार हे करत आहेत.

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें