Search
Close this search box.

वनहक्क पट्ट्या संदर्भात कुणीही वंचित राहु नये :-आ. इंजि.राजकुमार बडोले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनिश्वर):—

जिल्ह्यातील अर्जुनी-मोर. विधानसभा क्षेत्रात अनेक गावातील शेतक-यांचे वनहक्क दाव्यांचे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत. काही दावे अटी आणी शर्तीमुळे रेंगाळलेले आहेत. ती सर्व प्रकरणे निकाली कसे काढता येतील व सर्वांना वनहक्काचे पट्टे मिळावे यासाठी आपन प्रयत्न सुरु केले आहे.या जनता दरबाराचे माध्यमातुन रेंगाळलेले वनहक्क दाव्यांचे प्रकरण निकाली काढण्यासाठी आपन प्रयत्नशील आहोत. आज अर्जुनी-मोर. विधानसभा क्षेत्रातील प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयात पडुन असल्याचे निदर्शनास आले आहे.या संदर्भात आपण लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावुन हे प्रकरण मार्गी लावण्याचे दृष्टीने आपन प्रयत्न करु.अर्जुनी-मोर. विधानसभा क्षेत्रातील कुणीही वनहक्क पट्यासाठी वंचित राहु नये असे आपले प्रामाणिक प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांनी केले आहे.
अर्जुनी-मोर. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ( ता.7 एफ्रील)वन हक्क दावे आणि जनसामान्यांच्या विविध समस्यांवर मार्ग काढण्यासाठी विशेष जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले.त्यावेळी आमदार राजकुमार बडोले बोलत होते.या जनता दरबारात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपल्या समस्या मांडल्या.

या जनता दरबाराचे आयोजन वन हक्क दाव्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण व्हावे या उद्देशाने करण्यात आले होते. शेकडो नागरिकांनी आपल्याला भेडसावणाऱ्या विविध समस्या सविस्तरपणे मांडल्या, ज्यातील अनेक समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यात आले. नागरिकांना यामुळे दिलासा मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जि.प. महिला व बालकल्याण सभापती पोर्णिमाताई ढेंगे, उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे, अर्जुनी-मोर तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, सडक अर्जुनी तहसीलदार इंद्रायणी गोमासे, माजी जि.प. उपाध्यक्ष यशवंत गणवीर, अर्जुनी-मोर पंचायत समिती सभापती आम्रपालीताई डोंगरवार, सडक अर्जुनी पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यशवंत परशुरामकर, नगराध्यक्ष मंजुषाताई बारसागडे, जिल्हा परिषद सदस्य कविताताई रंगारी, पं.स. गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर, प्रकल्प निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी सदाशिव अवगान नवेगाव बांध ,पवार गोठाणगाव, बहुरे अर्जुनी मोर यांची उपस्थिती होती.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, भाजप तालुकाध्यक्ष विजय कापगते, माजी जि.प. सदस्य किशोर तरोणे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें