सडकअर्जुनी (अनिल मुनिश्वर) –
संबोधी बौद्ध विहार समिती सडक अर्जुनीच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती सोहळ्यानिमित्त संबोधी बौद्ध विहार तहसील कार्यालयासमोर सडक अर्जुनी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ मुख्याध्यापक दुर्योधन राऊत व संस्थापक जितेंद्र मौर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तर 14 एप्रिल रोजी संबोधी बौद्ध विहार सडक अर्जुनी येथे सकाळी 8 वाजता बुद्ध पूजा व वंदना, सकाळी 9 वाजता शिक्षक विलास कोटांगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सकाळी 9.30 वाजता प्रा.डॉ. संजोग शेंडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता स्थानिक आंबेडकर वार्डात ध्वजारोहण व पूजा, 10 .30 वाजता पटेल वार्ड येथे ध्वजारोहण व पूजा, सकाळी 11 वाजता आनंद नगर येथे ध्वजारोहण व पूजा, दुपारी 2 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथून धम्म रॅली चे शुभारंभ करण्यात येणार असून, सायं 7 वाजता संबोधी बुद्ध विहार येथे रॅलीचे समापन. व रात्री 8 वाजता प्रबोधनकार अमोल राऊत यांचा * जल्लोष भिमाचा* संगीतमय जाहीर समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या हक्काचा माणूस शिवसेना गोंदिया जिल्हा समन्वयक डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांच्या हस्ते, आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांचे अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. सह उद्घाटक म्हणून डॉ.अजय लांजेवार, गव्हर्मेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वसंत लांजेवार, हे लाभणार असून प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष तेजराम मडावी ,मुख्याधिकारी सारंग खांडेकर , पोलीस निरीक्षक मंगेश काळे, न .प. उपाध्यक्ष वंदनाताई डोंगरवार, शिक्षक विलास कोटांगले, प्रमोद फुले , सुरेश अगडे, नौशाद अली, मिलिंद राऊत , पं.स. सदस्य अल्लाउद्दीन राजानी, इंजि. किशोर बन्सोड, स.पो.नी .प्रमोद बांबोर्डे, इंजि.विवेकानंद लांजेवार, दिनेश पंचभाई , पंकज जांभुळकर, संस्थापक रवींद्र पंचभाई, प्रा. संतोष रामटेके, प्रा. दिवाकर कांबळे, न. प. सभापती आनंदकुमार अग्रवाल, शशिकला टेंभुर्णे, रजनी परिहार, नगरसेवक असलेष अंबादे, गोपीचंद खेडकर, दीक्षा ताई भगत, देवचंद तरोने , अंकित भेडारकर, शाहिस्ता शेख, महेंद्र वंजारी, कामिनी कोवे, सायमा शेख, रेणुका अग्रवाल, कमलादेवी अग्रवाल, प्रा. डॉ. रिता लांजेवार, राजकुमार हेडाऊ, पत्रकार अनिल मुनिश्वर,बिरला गणवीर, प्रा.राजकुमार भगत,रेवाराम मेश्राम, ओमप्रकाश टेंभुर्णे,राजेश मुनीश्वर, शाहिद पटेल, अशोक इडपाते आदी मान्यवर उपस्थित राहतील. कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष विदेश टेंभुर्णे, उपाध्यक्ष रंजीता मेश्राम,सचिव भाग्यवान शहरे, सहसचिव जयंत शहारे, कोषाध्यक्ष रूपचंद खोब्रागडे, सदस्य असलेश अंबादे, जगदीश शहारे, पुण्यशील कोटांगले , राहुल गणवीर, जागेश्वर वैद्य, दिग्रेस टेंभुर्कर, राकेश शहारे, परसराम सूर्यवंशी यांनी केले आहे.
