सडकअर्जुनी(अनिल मुनिश्वर):————- दिनांक 5 जुलै 2025 रोज शनिवारला “एक पेड मां के नाम” या उपक्रमांतर्गत शालेय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निकेश भेंडारकर तर प्रमुख अतिथीस्थानी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हार्दिक खोटेले, शामकाला हुकरे, उच्च श्रेणी मुख्याध्यापक मधुकर येरणे सर, योगेश्वर कापगते सर, पृथ्वीराज चचाने सर, राजेश शेंडे सर, जीवन म्हशाखेत्री सर, रजनी मेश्राम मॅडम, भावना शेंदरे मॅडम तसेच नवनियुक्त शालेय मंत्रिमंडळ पदाधिकारी उपस्थित होते.
