सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर):———-दिनांक 5 जुलै 2025 रोज शनिवारला दप्तरमुक्त शनिवार या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डोंगरगाव खजरी येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उच्चश्रेणी मुख्याध्यापक मधुकर येरणे सर, मतमोजणी अधिकारी राजेश शेंडे सर,क्षेत्रीय अधिकारी कापगते सर, केंद्राध्यक्ष पृथ्वीराज चचाने सर, मतदान अधिकारी 1 भावना शेंदरे मॅडम, मतदान अधिकारी 2 रजनी मेश्राम मॅडम, मतदान अधिकारी क्रमांक 3 मशाखेत्री सर यांनी कार्य सांभाळले. निवडणूक आनंददायी पद्धतीने तसेच काटेकोरपणे घेण्यात आली. शालेय मंत्रिमंडळात शाळा नायक मयंक कोरे, शाळा उपनायक मीना भेडारकर, क्रीडा प्रमुख दिशांत खोटेले, स्वच्छता प्रमुख श्रवणकुमार खंडारे, सांस्कृतिक प्रमुख तन्मय खोटेले, शालेय पोषण आहार प्रमुख गौरव खोटेले, आरोग्य प्रमुख प्रियंका मेंढे अभ्यास प्रमुख तेजस खोटेले यांची विद्यार्थ्यांनी बहुमताने निवड केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
