गोंदिया(अनिल मुनिश्वर):–
जिल्ह्यातील आमगाव येथील आंबेडकर चौकात दोन दुकानदारांत हाणामारी झाली होती. त्यामुळे आमगाव नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या सर्व फुटपाथवरील अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे अटींचे पालन करू मात्र अतिक्रमण कारवाई करू नका अशी मागणीचे निवदेन अतिक्रमणधारकांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले. अनेक वर्षांपासून फुटपाथवर अनेकांनी दुकाने थाटली. दुकानाच्या भरवशावर अनेक लोकांनी आपले घर व परिवार सांभाळत आहेत. त्यांच्याकडे कामासाठी कोणताही पर्याय नाही.आंबेडकर चौकात दोन दुकानदारांत हाणामारी झाली.अशी घटना यापुढे घडणार नाही. दुकान असलेल्या ठिकाणाबाहेर आलेले अतिक्रमण आम्ही स्वतः काढू. परंतु आम्हाला आमच्या दुकानातून बाहेर काढू नये, अशी मागणी दुकानदारांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली. पालिकेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात येईल, असा शब्द देखील दुकानदारांनी दिला.
