सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर):–
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन शिवसेना (शिंदे गट ) चे वतीने 17 मार्च रोजी दुर्गा मंच सडक अर्जुनी येथे करण्यात आले आहे. त्यानिमित्त सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शोभायात्रा, दुपारी 2 ते साय.5.30 वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सायं.5.30 ते 7.30 पर्यंत प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन, रात्री 8 वाजता पुणे येथील ग्रुपच्या वतीने ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सहसराम कोरोटे, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख मयाताई शिवणकर, शिवसेना विधान सभा प्रमुख जितेंद्र कुमार मौर्य, शिवसेना सडक अर्जुनी तालुकाप्रमुख विलास कापगते, गोरेगाव तालुकाप्रमुख अजय भाऊ बिजेवार, अर्जुनी मोरगाव तालुकाप्रमुख जगदीश चितलांगे, सडक अर्जुनी तालुका महिला प्रमुख सिंधुताई बारसागडे, शिवसेना तालुका युवा प्रमुख तुलसीदास शिवणकर, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तथा शिवसेना जिल्हा समन्वयक डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी केले आहे.


