सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर):–
सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य . व उच्च माध्य.विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय ,जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 16 मार्च 2025 रोज रविवारला लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने विद्यालयाच्या प्राचार्या मा .उमा बाच्छल यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यवेक्षक मा.डी.एस. टेंभुर्णे , शा. शि. एस. यु. पवार, स. शि. डी. आर. दिघोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संत तुकाराम पुण्यतिथी(बीज) साजरी करण्यात आली. विद्यालयातील सर्व मान्यवरांनी संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले .
यावेळी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन श्री एस. यु. पवार यांनी केले तर आभार श्री डी. आर. दिघोरे यांनी मानले.
