Search
Close this search box.

“सन्मान सावित्रीच्या लेकीचा”
शिक्षक समितीच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

agmnews24

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनीश्वर):–

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा अर्जुनी मोर च्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ( दि.8 मार्च ) जागतिक महिला दिनानिमित्त “सन्मान सावित्रीच्या लेकीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पद्मश्री डॉ परशुरामजी खुणे यांनी ” समाजाच्या उत्थानासाठी, देशाच्या विकासासाठी महिलांचे योगदान अतुलनीय आहे. नारीशक्ती मुळेच चांगला समाज निर्माण होऊन देश विकासाला गती प्राप्त होते. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान झाला पाहिजे. शिक्षक समितीचा हा उपक्रम अभिनंदनीय आहे.” असे विचार व्यक्त केले.
झाडीपट्टी नाट्यक्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व पद्मश्री डॉ परशुरामजी खुणे यांच्या शुभहस्ते उपस्थित सर्व महिला, नवनियुक्त शिक्षक आणि पुरस्कार प्राप्त शाळा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटन म्हणून आम्रपाली डोंगरवार सभापती पं. स. अर्जुनी मोर. अध्यक्ष संदीप तिडके, स्वागताध्यक्ष किशोर डोंगरवार, प्रमुख अतिथी म्हणून सौ पोर्णिमाताई ढेंगे सभापती जि. प. गोंदिया, सौ. रचनाताई गहाणे सदस्या जि प, सौ जयश्रीताई देशमुख सदस्या जि प, सौ कविताताई कापगते सदस्या जि. प., श्री संदीपजी कापगते उपसभापती पं. स.अर्जुनी मोर श्री नाजूकजी कुंभरे सदस्य प स, श्री नूतनलालजी सोनवणे सदस्य प स, सौ. शालिनी डोंगरवार सदस्या प स, सौ. कुंदाताई लोगडे सदस्या प स, सौ. भाग्यश्रीताई सयाम सदस्या प स, सौ. पुष्पलताताई दृगकर सदस्या प स, श्री नाजूक लंजे शिक्षण विस्तार अधिकारी,श्री बी डब्लू भानारकर शिक्षक विस्तार अधिकारी, पी ए कापगते केंद्रप्रमुख, शिक्षक समिती पदाधिकारी श्री अशोक बिसेन, गौतम बांते, मुकेश राहांगडले, प्रतिमा खोब्रागडे, भारती तिडके, विनोद बडोले, दिलीप लोदी, सुरेंद्र भैसारे, श्रीकृष्ण कहालकर, यु जी हरीणखेडे, वंदना झोडे, मीनाक्षी पंधरे, उपस्थित होते.
शिक्षक समितीच्या वतीने सौ पौर्णिमाताई ढेंगे नवनियुक्त सभापती जिल्हा परिषद गोंदिया व पद्मश्री डॉ परशुरामजी खुणे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सन्मान सावित्रीच्या लेकीचा उपक्रमाअंतर्गत उपस्थित सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती महिला पदाधिकारी, सर्व शिक्षिका यांना प्रमाणपत्र व सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र देऊन सन्मानित करण्यात आले. नवनियुक्त शिक्षक यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र देऊन सत्कार करण्यात आले तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळा मोरगाव , सिरेगावबांध, इंजोरी, परसोडी, दिनकरनगर , प्रधानमंत्री पोषणशक्ती परसबाग स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळा परसोडी, आंभोरा, गंधारी, महालगाव, येरंडी भिवखिडकी या शाळांना सन्मानचिन्ह व तैलचित्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी तालुक्यातील बहुसंख्येने शिक्षक उपस्थित होते.
यावेळी सौ रचनाताई गहाणे, पौर्णिमाताई ढेंगे, आम्रपाली डोंगरवार, नाजूकजी कुंभरे, सुरेंद्र भैसारे यांनी मनोगत व्यक्त केले.सर्वांनी आपल्या मनोगतातून महिला सन्मानाचे महत्त्व विशद करून शिक्षक समितीच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सपना श्यामकुवर यांनी शिक्षक समितीच्या या वर्षभरात केलेल्या कार्याची माहिती दिली तर विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी शिक्षक समितीचे ध्येयधोरणे आणि बालक पालक व शिक्षक याबद्दलची भूमिका मांडली. जिल्हाध्यक्ष संदीप तिडके यांनी समितीचा वार्षिक कार्यवृत्तात मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण कहालकर यांनी केले तर रेवानंद उईके यांनी आभार मानले.
या सन्मान सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आशिष कापगते, रेवानंद उईके, दिलीप लोदी, सुनील बडोले, ओमप्रकाश मस्के, देवेंद्र देशकर, महेंद्र कोहाडकर, नरेंद्र बनकर , मंगेश पर्वते, संजय कोरे, देवेंद्र नाकाडे, आर के कापगते, सुभाष मानकर, युवराज नागपुरे, प्रमोद कापगते, विनोद चीचमलकर, नेतराम मलगाम, राजेश तिरगम, विनोद गहाणे, विलास पाऊलझगडे, विश्वजित मंडल, संजय मस्के, संदेश शेंडे, नरेश प्रधान, नरेश आकरे, भागवत गहाणे, नरेश परशूरामकर, किरण लाडे, वनिता झोळे, एन जे पठाण, संध्या मते, भारती भेंडारकर, वंदना राऊत, शिल्पा गहाणे, शारदा कापगते, तसेच सर्व शिक्षक समिती पदाधिकारी व महिला आघाडी शाखा अर्जुनी मोर यांनी परिश्रम घेतले.

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें