सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर):-
येथील गोंदिया शिक्षण द्वारा संचलित मनोहरभाई पटेल महाविद्यालय सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला.हा कार्यक्रम “सांस्कृतिक विभाग व वुमन सेल” विभागाद्वारे प्रा. माधुरी राऊत व डॉ. आरती वलेच्छा यांनी आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चेतनकुमार मसराम होते. तर प्रमुख अतिथी म्हणून झाडीपट्टीच्या बहिणाबाई कवयित्री आदरणीय अंजनाबाई श्रीराम खुणे ह्या होत्या. महिला दिनानिमित्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या वतीने फूड कार्निवल/फेस्टिवल (आनंद मेळावा)आयोजित केले होते.तसेच पुष्पगुच्छ स्पर्धा देखील घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते प्रमुख अतिथी कवयित्री अंजनाबाई खुणे यांच्या पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कवयित्री अंजनाबाई यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,माता रमाई ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,संसार,नातेसंबंध,व्यक्ती,बालपण, सासू – सून, समाज प्रबोधन इत्यादी अनेक विषयावर कविता सादर करून उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच प्रत्येकाने स्त्रीचा सन्मान करावा व महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान हाच खरा महिला दिन असे मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्राचार्य यांनी जागतिक महिला दिन 2025 वर्षीचा theme Accelerate Action क्रिया वेगवान यानुसार महिलांचा सशक्तीकरण व स्त्री- पुरूष समानता तसेच होणारे अन्याय – अत्याचार मुक्त महिला विकासाला वेगवान करण्याकरिता सर्वांनी विशेष पाऊल उचलावे असे आव्हान केले.त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक करावे व प्रत्येक स्त्रीने सक्षम व्हावे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. चेतनकुमार मसराम यांनी आपल्या अध्यक्षांनीय भाषणातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.माधुरी राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आरती वलेच्छा यांनी केले तर आभार डॉ सरिता ठाकूर यांनी मानले.
त्यानंतर फूड कार्निवल/फेस्टिवल चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून केले गेले. विद्यार्थ्यांनी विविध व्यंजने तयार करून आकर्षक स्टॉलने अतिथींचे मने जिंकली.या कार्यक्रमात डॉ.गोरघाटे,डॉ. आकरे,डॉ. बिसेन,डॉ.पाटील,डॉ.ठाकरे,डॉ.सय्यद, प्रा.कळंबे,डॉ.स्मिता लांजेवार, प्रा.कटरे,प्रा.जांबलधरे, प्रा.पडोळे,श्री.चाचेरे,श्री.नागपुरे,श्री.लाडे,श्री.मोहिते,श्री.कोकोडे, इ.उपस्थित होते.
