सडक अर्जुनी(तालुका प्रतिनिधी):-
दिनांक 8 मार्च 2025 ला रॉयल प्रिन्स पब्लिक स्कूल कोहमारा येथे जागतिक महिला दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनी व महिला जागतिक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घघाटन ठाणेदार मंगेश काळे यांच्या हस्ते तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनिश्वर यांच्या अध्यक्षतेत ओमप्रकाश टेंभुर्णे,अंजली मुनिश्वर मेहजबिन राजानी, संस्थापक जितेंद्र मोरया,पूर्वी मोरया यांच्या उपस्थितीत शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून महिलांच्या हस्ते केक कापून सर्वांचे स्वागत करून महिलांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देऊन पार पडले,यावेळी मोठ्या संख्येत महिला व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग सादर करून त्याबद्दल माहिती दिली. यामध्ये नर्सरी ते इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगाची पाहणी केली व विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधून त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टाल आणि गेम्स पण ठेवले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य सुनिता बंग तसेच शिक्षिका स्नेहा मेश्राम, सुजाता भिमटे,ममता मसराम, रोशनी राणे,शिल्पा कुंभरे,सुरभी नेवारे,मनीषा सिडाम,ज्ञानेश्वर पातोळे यांनी सहकार्य केले
