सडक अर्जुनीत मंडल यात्रेचे जोरदार स्वागत सडक अर्जुनी देशात सात ऑगस्ट १९९० ला मंडळ लागू झाल्याची घोषणा करण्यात आली,मंडल आयोगाने ओबीसी समाजाला आरक्षण दिल्याने हा दिवस ओबीसी अधिकार दिन म्हणून साजरा व्हावा या निमित्ताने नागपूर येथून जनजागृतीपर मंडल यात्रा काढण्यात आली ही यात्रा सहा ऑगस्टला सकाळी अकरा वाजता सडकअर्जुनी येथील दुर्गा चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पुष्पहार घालून, समाजबांधवांच्या वतीने मंडल यात्रेचे मुख्यसंयोजक उमेश कोराम आणि त्यांच्या सहकार्याचे स्वागत करण्यात आले, ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, ओबीसीचा बॅकलाग भरून काढावा,प्रत्येक तालुक्यात वस्तीगृह व्हावे, क्रिमीलेयर अट रद्द व्हावी, यासारख्या मागण्या घेऊन ही मंडल यात्रा 2 ऑगस्टला नागपूर येथून निघाली व वर्धा,यवतमाळ,चंद्रपूर, गडचिरोली,नवेगावबांध मार्गे सडकअर्जुनी वरून गोंदियाकडे रवाना झाली यावेळी माजी सामाजिक न्यायमंत्री,आ.राजकुमार बडोले,ओबीसी संघटनेचे दिनेश हुकरे,नगरसेवक देवचंद तरोने, बँकेचे संचालक गंगाधर परशुरामकर, नगरपंचायत उपाध्यक्ष वंदना डोंगरवार,सरपंच माधव तरोने, सभापती चेतन वळगाये,गायत्री इरले पुष्पा खोटेले,कुणबी समाजाचे अध्यक्ष अनिल मुनिश्वर,रोशन बडोले, जितेंद्र शहारे,मधुसूदन दोनोडे,अनिल मेश्राम टीकाराम भेंडारकर अरविंद मेंढे,ओमप्रकाश टेंभुर्णे,शाहिद पटेल, ओमराज दखणे,योगराज दोनोडे,अशोक लांजेवार, चिल्या ब्राह्मणकर,शालिंदर कापगते,भूमेश्वर शेंडे निशांत राऊत,ईश्वर कोरे,अरविंद फुंडे, नगरसेवक असलेश अंबादे,सरपंच तुलसीदास शिवणकर, हरिदास हत्तीमारे, हरीश कोहळे,संतोष लाडे,बंडू कावडे, किशोर शेंडे, स्वप्निल ब्राह्मणकर, प्रकाश काशीवार,खुमेंद्र टेंबरे, इरफान शेख व ओबीसी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें