Search
Close this search box.

फुटाळा ग्रामपंचायतीचा‘केशर’संकल्प:विकासाची नवी दिशा!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडकअर्जुनी(अनिल मुनिश्वर):——
आजच्या धावपळीच्या युगात, जिथे प्रत्येकजण आपापल्या वैयक्तिक प्रगतीचा विचार करतो, तिथे सामूहिक विकासाचं स्वप्न पाहणं आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अथक प्रयत्न करणं हे खरंच कौतुकास्पद आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा ग्रामपंचायतीने हाच आदर्श घालून दिला आहे. आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेलं त्यांचं पाऊल हे इतर ग्रामपंचायतींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
डॉर्फ केटल केमिकल इंडिया लिमिटेडच्या CSR पुढाकारातून, सप्रेम संस्था आणि नवदृष्टी संस्थांच्या सहकार्याने, गोंदिया जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींना केशर आंब्याची रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या उपक्रमात सहभागी होऊन फुटाळा ग्रामपंचायतीने तब्बल ७०० केशर आंब्याची झाडे मिळवली आहेत. केवळ मिळालेल्या झाडांवरच न थांबता, सरपंच सौ. लता गहाणे यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून आणखी ३०० झाडे लावण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे, हे विशेष.
हा केवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम नाही, तर गावाच्या आर्थिक वृद्धीसाठी टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. केशर आंब्याची लागवड भविष्यात ग्रामपंचायतीसाठी उत्पन्नाचा एक मोठा स्रोत ठरू शकते, ज्यामुळे गावाच्या विकासाला गती मिळेल. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक प्रशासनाचा मिळालेला पाठिंबा या उपक्रमाला अधिक बळ देत आहे.
३ जुलै २०२५ रोजी दुपारी 12 वाजता फुटाळा ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करण्यात आलेला वृक्षारोपण कार्यक्रम हा केवळ औपचारिक सोहळा नाही, तर तो सामुदायिक एकजुटीचं प्रतीक आहे महिलांचा सहभाग, ग्रामस्थांची मदत आणि पंचायत समितीचे सभापती चेतन वळगाये पंचायत समितीचे उपसभापती निशा काशीवार पं.सं.सदस्य सपना नाईक शिवाजी गहाणे, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी दिलीप खोटेले, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनिश्वर, अरविंद मेंढे,मनरेगाचे कार्यक्रम अधिकारी हरीश कटरे,वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक संजय पटले,वनरक्षक प्रदीप हत्तीमारे,हिना बागडकर ग्रामपंचायत चे उपसरपंच गीता मेश्राम,ग्रामपंचायत सदस्य शेवंता गहाणे वनिता गोबाडे,योगिता गहाणे, प्रभाकर गोबाडे अरविंद सोनवणे गुलाब ठाकरे माजी सरपंच रावजी गहाणे,उमेश गोबाडे, पोलीस पाटील जयश्री वैद्य, डव्वा चे सरपंच योगेश्वरी चौधरी, खडकी चे सरपंच शर्मिला चिमणकर गायत्री इरले तंटामुक्ती अध्यक्ष नीलकंठ गहाणे दीपक गहाणे, मनोज वैद्य,आणिक गहाणे, ग्रामपंचायतचे परिचर सुनील सोनवणे रोजगार सेवक तेजराम मेश्राम, प्रणय भिवगडे राहुल गोबाडे,विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, मनरेगाचे अभियंते, आरोग्य विभागाचे कर्मचारी, जिल्हा परिषदेचे शिक्षक व विद्यार्थी तसेच गावकऱ्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची कार्यक्रमाची भव्यता वाढविली. पुष्पगुच्छांऐवजी झाड देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्याची आगळीवेगळी संकल्पना गावाच्या पर्यावरणाबद्दलच्या कटिबद्धतेचं दर्शन घडवते.
फुटाळा ग्रामपंचायतीने दाखवून दिलं आहे की, योग्य नियोजन, लोकसहभाग आणि दूरदृष्टी असेल, तर कोणतंही ध्येय गाठणं अशक्य नाही. ‘गाव तिथे झाड’ ही संकल्पना केवळ घोषवाक्य न राहता, फुटाळा ग्रामपंचायतीने ती प्रत्यक्षात उतरवून दाखवली आहे. या यशोगाथेचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन फुटाळा ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाला पाठिंबा देऊया.
कार्यक्रमाची संचालन ग्रामपंचायत अधिकारी कुणाल हत्ती मारे यांनी तर प्रस्ताविक व आभार प्रदर्शन सरपंचा लता गहाणे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणावर मोलाचे मार्गदर्शन केले

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा: धान खरेदीचे उद्दिष्ट २० लाख क्विंटलने वाढवले आता २० जुलै पर्यंत होणार धान खरेदी!! माजी मंत्री,आ.राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली होती मागणी

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा: धान खरेदीचे उद्दिष्ट २० लाख क्विंटलने वाढवले आता २० जुलै पर्यंत होणार धान खरेदी!! माजी मंत्री,आ.राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली होती मागणी