सडकअर्जुनी(अनिल मुनिश्वर)
तालुक्यातील सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय,रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुणादेवी लोहिया प्राथमिक शाळा सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४एप्रिल२०२५रोज सोमवारला विद्यालयात लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक – संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी मा. अध्यक्षांनी शाळेसमोरील संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण केले तसेच विद्यालयात माता सरस्वतीच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. आ.न. घाटबांधे, उपाध्यक्ष लो.शि.संस्था, मा. थेर सर , सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी , मा.एम. एन अग्रवाल, सेवानिवृत्त प्राचार्य ,मा.अनिल मेश्राम, से.नि.प्राचार्य , मा.समिम अहमद सय्यद ,मा. चरण शहारे, मा.महादेव लाडे, मा-पुरुषोत्तम लांजेवार, मा .पुरुषोत्तम भिवगडे, मा.हसन भांडारकर, प्राचार्या मा. उमा बाच्छल , प्राचार्य ,मा.गुलाबचंद चिखलोंडे मुख्याध्यापक मा एम. के. शिंदे ,पर्यवेक्षक मा.डी. एस.टेंभुर्णे , प्राध्यापक मा. आर .एन. अग्रवाल, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांनी डॉ .बाबासाहेबांचे जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेऊन जीवनात यश प्राप्त करावे असे मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच अतिथी आणि विद्यालयातील शिक्षकांनी आपल्या भाषणातून
डॉ. बाबासाहेबांविषयी माहिती दिली व मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा गीत व भाषणातून डॉ. बाबासाहेबांच्या जीवनाचा गुणगौरव केला.
कार्यक्रमात एन .एम .एम. एस. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या रुद्र ब्राह्मणकर, यश्मित बडोले, कू.दिव्या भोयर या विद्यार्थ्यांचे अतिथिंच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आले.तसेच इयत्ता ९ वी करीता नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या कु. दिव्या भोयर हीचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला लोहिया शिक्षण संस्थेच्या विविध कार्यकारीनींचे पदाधिकारी व सदस्यगण, विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,निमंत्रित पाहुणे,गावकरी,पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन स. शिक्षिका कू यु. बी. डोये यांनी केले तर आभार मुख्याध्यापक मा.मनोज शिंदे यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता’ वंदेमातरम् ‘ या गीताने करण्यात आली.
