मुंबई(अनिल मुनिश्वर):—
दिनांक– 02/04/2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा.ना.गणेशजी नाईक साहेब यांचे समवेत महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना नागपूर यांचे प्रदेश कार्यकारणी समवेत मुंबई मंत्रालयात सभा पार पडली. या सभेमध्ये महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना यांनी निवेदनाद्वारे सादर केलेल्या विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली.
विशेष करून आहार भत्ता, प्रोसाहन भत्ता, मेडिक्लेम— कॅशलेस सेवा, जुनी पेन्शन योजना लागू करणे, पदनामात बदल करणे, तसेच गणवेश भत्ता व गणवेश दुरुस्ती इत्यादी विषयांवर सखोल चर्चा झाली. सदर चर्चेमध्ये माननीय मंत्री महोदय, मंत्रालयातील संबंधित कक्ष अधिकारी, उपसचिव वने हे सकारात्मक असून यांवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. या सभेसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख नागपूर श्रीमती शोभिता बिश्वास मॅडम यासुद्धा कॉन्फरन्स द्वारे सामील झाल्या तसेच संघटनेच्या वतीने श्री.राजाराम मांजे प्रदेशाध्यक्ष , महासचिव शैलेंद्र भदाने,प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी गाजी शेख,नागपूर सर्कल अध्यक्ष संजय भेंडे , प्रदेशपदाधिकारी समीर जाधव,अभिजित पाटील, ठाणे वनविभाग अध्यक्ष महेंद्र साबळे , शहापूर वनविभाग अध्यक्ष प्रवीणजी विशे तसेच निलेश भेरे, योगेश पाटील हे उपस्थित होते.
