Search
Close this search box.

लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणात आरोपीला एक वर्षाचा सक्षम कारावासाची शिक्षा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(तालुका प्रतिनिधी):–

घराशेजारील राहत असलेल्या महीलेच्या घरी तुप मागण्याच्या बाहण्याने आरोपीने महीलेची छेडखाणी केल्याच्या प्रकरणात आरोपीला एक वर्षाचा सक्षम कारावास व अडीज हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सन २०१९ मधील या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. विक्रम आव्हाड यांनी २६ मार्च २०२५ ला निकाल सुनावला आहे.

तालुक्यातील पांढरवाणी येथील फिर्यादी ही १९ जुलै २०१९ ला घरी एकटीच समोरचे छपरीत टिव्ही पाहत जेवन करीत असतांना गावातील राहणारा आरोपी नामे शेगराम पुस्तोडे हा घरी आला व मला तुप घेणे आहे. तुप आहे काय असे फिर्यादीला विचारले तेव्हा फिर्यादी म्हणाली की, माझे जेवन झाल्यावर तुप देते व तिने आरोपिला बसण्यास खुर्ची दिली. त्यानंतर थोड्याच वेळात जेवनाचा ताट घेवुन फिर्यादी स्वयंपाक खोलीत गेली व जेवनाचा ताट बाजुला ठेवुन तुपाचा डब्बा गॅसवर गरम करण्यास मांडला आणि स्वयंपाक खोलीत गॅस जवळ उभी असतांना फिर्यादीच्या मागे आरोपी स्वयंपाक खोलीत आला व म्हणाला की, हा तुप गरम करावा लागतो का? त्यावर फिर्यादी हो म्हणाली असता आरोपी शेगराम
पुस्तोडे यांनी सुना मौका पाहून फिर्यादीस मागेहुन कवटाळले. आरोपी तुप मागण्याच्या बहाण्याने फिर्यादी च्या घरी जावुन फीर्यादीचा
लैंगीक छळ केल्यामुळे फिर्यादी यांनी आरोपी विरुद्ध पो. स्टे डुग्गीपार येथे भा. द. वी कलम
३५४, ४४८ अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खुशाल भस्मे यांनी केला होता. या प्रकरणात फिर्यादी, पंच, साक्षीदार, संधी साक्षीदार व तपासी अधिकारी असे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले होते.

त्यानंतर आरोपी शेगराम पुस्तोडे विरुद्ध सबळ पुरावा अभिलेखावर आल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. विक्रम आव्हाड यांनी आरोपी शेगराम पुस्तोडे यास संक्षीप्त फौजदारी प्रकरण १५८/२०१९ यात भादवी कलम ३५४(१) (अ) यात एक वर्षाचा सश्रम कारावास व दीड हजार रुपये दंड व भादवी कलम ४४८ मध्ये सहा महीने सश्रम कारावास व एक हजार रुपये अशी दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच सदरची दंडाची रक्कम अडीज हजार रुपये अपील कालावधी संपल्यानंतर फिर्यादीस देण्यात येईल असे न्यायनिर्णात जाहीर केले आहे. या प्रकणात सरकार पक्षापर्फे सहाय्यक सरकारी

अभियोक्ता ऍड. ओमप्रकाश गहाणे यांनी काम पाहीले. तसेच कोर्ट पैरवी करणारे पोलीस हवालदार चंदर गुट्टे यांनी सदर प्रकरणात मदत केली.

सदर न्यायनिर्णय हा २६ मार्च २०२५ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सडक अर्जुनी येथील न्यायाधिश डॉ. विक्रम आव्हाड यांनी दिला आहे. अशा प्रकारचा न्यायनिर्णय सडक अर्जुनी न्यायालयाच्या गेल्या दहा वर्षाच्या कालखंडात प्रथमच देण्यात आल्यामुळे सदरच्या न्यायनिर्णयाचे समाजातील सर्व स्थरातुन स्वागत केले आहे. स्त्रियांवर होणा-या अत्याचाराला पायबंद बसविण्यासाठी असे धाडसी न्यायनिर्णय गरजेचे आहे.

  • ऍड. ओमप्रकाश गहाणे,
  • सरकारी अभियोक्ता
Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें