सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर):–
तालुक्यातील खडकी/डोंगरगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदाकरिता 28 मार्च 2025 ला सरपंच शर्मिलाताई मधुकर चिमणकर यांच्या अध्यक्षतेत निवडणूक घेण्यात आली यावेळी उपसरपंच पदाकरिता चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यावेळी पुरुषोत्तम मेश्राम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने होमराज दखणे,सुभाष कुडमते व कौतुका कुंभरे यांचे अर्ज निवडणुकीत असल्याने निवडणूक चुरशीची झाली,ओमराज दखणे यांना 4 मते कौतुका कुंभरे यांना 4 मते सुभाष कुडमते यांना शून्य मते मिळाल्याने ओमराज दखणे व कौतुका कुंभरे यांच्यात चूरस होऊन समान मते मिळाल्याने सरपंच शर्मिलाताई चिमणकर यांचे मत निर्णायक असल्याने ओमराज दखणे यांच्या बाजूने पडल्याने ओमराज दखणे यांचा विजय झाला व ते उपसरपंच पदावर विराजमान झाल्याचे जाहीर करण्यात आले निवडणूक निरीक्षण अधिकारी म्हणून नायब तहसीलदार त्र्यंबक गुडदे,जगदीश जांभुळकर व ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र पदा यांनी काम सांभाळले.निवडणूक शांततेत पार पडली…
🌹💐 ग्रामपंचायत खडकी/डोंगरगाव उपसरपंच पदी ओमराज दखणे यांची निवड झाल्यामुळे सरपंच शर्मिलाताई चिमणकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे…


