सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर):—
३० मार्च २०२५ रोज रविवारला गुढी पाडव्याचे औचित्य साधून “गुढीपाडवा प्रवेश वाढवा” या उपक्रमांतर्गत तालुक्यातील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा,डोंगरगाव खजरी येथे पहिल्या वर्गात भरतीस पात्र असलेल्या एकूण २८ विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात गावातील हनुमान मंदिर येथून पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या बैलबंडीवर दाखल पात्र विद्यार्थ्यांना बसवून लेझिमच्या गजरात व भजन दिंडीने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गावातील बहुसंख्य नागरिक, पालकवर्ग व विद्यार्थी तसेच मा. चेतनभाऊ वडगाये सभापती पंचायत समिती सडक अर्जुनी तसेच मा. डॉ.भुमेश्वरजी पटले जि.प.सदस्य यांचासुद्धा सहभाग होता.
मिरवणुकीनंतर शाळेच्या प्रांगणात ज्ञानाच्या गुढीचे पूजन करून भरतीस पात्र विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसे घेऊन त्यांना शाळेत दाखल करण्यात आले. नवागतांचे पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पेढे भरवून नवागतांचे तोंड गोड करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष चेतनभाऊ वडगाये सभापती पंचायत समिती सडक अर्जुनी तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. भुमेश्वरजी पटले जि. प. सदस्य, सौ. पौर्णिमाताई गणविर सरपंच डोंगरगाव, ज्ञानेश्वरजी खोटेले उपसरपंच, तुकारामजी राणे, टिकारामजी शिवणकर,विनोदजी हुकरे,सौ.अर्चनाताई ब्राम्हणकर,सौ. ताराबाई कठाणे,सौ. प्रभाताई रामटेके ग्रा. पं. सदस्य, सौ. रंजुताई चाचेरे पोलीस पाटील डोंगरगाव, विजयजी कोरे माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,जांभूळकर सर प्राचार्य विक्रमबाबा हायस्कूल,मेश्राम मॅडम विक्रमबाबा हायस्कूल डोंगरगाव, निकेशजी भेंडारकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, रोशनजी खोटेले, दौलतजी खोटेले, हार्दिकजी खोटेले, प्रीतमजी खोटेले, सौ. मंजुषाताई डोये,सौ. वैशालीताई लांडगे, सौ, ममताताई चाचेरे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती,सौ. शामकलाताई हुकरे,सौं.अल्काताई मेश्राम,सौ.नम्रताताई कोरे अंगणवाडी सेविका हे होते.
शाळेचे मुख्याध्यापक येरणे सर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून शाळेतिल विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करून, शाळेच्या विद्यार्थ्यांना सुसंस्कार देवून, शाळेचा सर्वांगीण विकास साधून इंग्रजी शाळेला लाजवेल अशी आपली डोंगरगाव/ खजरी येथील जि. प. ची मराठी शाळा बनविण्याच्या मानस व्यक्त केला. चेतनभाऊ वडगाये यांनी शाळेच्या विकासासाठी बांधील असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश शेन्डे सर यांनी केले. तर पाहुण्यांचे आभार कु. भावना शेंदरे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चचाने सर, कापगते सर, कु.रजनी मेश्राम मॅडम, कु. शुभांगी काठाणे, कु. पुजा खोटेले यांनी अथक परिश्रम घेतले.


