गोंदिया(अनिल मुनिश्वर):–
जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे राजकुमार बडोले फाउंडेशन तर्फे
मा. आमदार राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन 28 मार्च 2025 ला सायंकाळी चार वाजता आ. राजकुमार बडोले यांच्या सडक अर्जुनी येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले आहे.आपल्या रक्ताने कुणाचा तरी जीव वाचू शकतो! या उदात्त हेतूने आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आपण या पवित्र कार्यात सहभागी होऊन समाजसेवेत हातभार लावावा,असे आवाहन राजकुमार बडोले फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे
आपली उपस्थिती रक्तदात्यांना आणि आम्हाला नवा हुरूप देईल…


