Search
Close this search box.

लाचखोर लेखाधिकारी संजय बोकडे एसीबीच्या जाळ्यात, शिक्षण विभागात खळबळ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनिश्वर):-

शिक्षण विभागाच्या लेखा परीक्षण पथकातील लाचखोर  लेखाधिकारी (वर्ग दोन) संजय रामभाऊ बोकडे अडीच हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात या प्रकारामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे

तक्रारदार मुख्याध्यापक पुरुष  वय ५७ वर्ष यांनी आरोपी  लोकसेवक संजय रामभाऊ बोकडे वय ४९ वर्ष,धंदा नोकरी,पद- लेखाधिकारी (वर्ग २) लेखा परीक्षण पथक शिक्षण विभाग गोंदिया. रा. प्रदीप सिंग वर्मा यांच्या घरी किरायाने, १८ पवनसुत नगर,रमणा मारुती बस थांब्याजवळ, नागपूर यांची
तक्रार
दि. २४/०३/२०२५ ला दिली पडताळणी करून
सापळा कार्यवाही
दि. २४/०३/२०२५
लाच रु.३०००/-
तडजोडी अंति लाच मागणी रू २५००/-
लेखाधिकारी कार्यालय, लेखा परीक्षण पथक, शिक्षण विभाग गोंदिया, मनोहर नगर परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय गोंदिया या ठिकाणी रंगेहात करण्यात आली

प्राप्त माहितीनुसार                                   तक्रारदार हे 57 वर्षीय  लोकसेवा विद्यालय  आणि कनिष्ठ महाविद्यालय कोसमतोंडी ता. सडक अर्जुनी येथे मुख्याध्यापक असून त्यांच्या विद्यालयात परिचर म्हणून नोकरी करणारे भिमराव रंगारी हे डिसेंबर २०२४ मध्ये मरण पावले आहेत. त्यांच्या सेवा अंतर्गत आश्वासीत प्रगती योजनेच्या दुसऱ्या  लाभाच्या वेतन निश्चितीची पडताळणी करण्यासाठी कागदपत्रे आलोसे यांना दिली होती. सदर वेतन निश्चितीची पडताळणी करण्यासाठी आलोसे हे ३०००/- रू लाच मागणी करीत असल्याबाबत
तक्रारदार यांनी ला.प्र.वि.कार्यालय गोंदिया येथे तक्रार दिली लाच मागणी पडताळणी दरम्यान तडजोडीअंती आरोपी लोकसेवक संजय रामभाऊ बोकडे वय 49 लेखाधिकारी (वर्ग दोन) लेखापरीक्षण पथक शिक्षण विभाग,गोंदिया यांनी तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष २५००/-रुपये लाच रकमेची मागणी करुन लाच स्वीकारण्याची
तयार दर्शवीली.सापळा कारवाई दरम्यान आलोसे ने पंचासमक्ष  २५००/- रू. लाच रक्कम स्वीकारली .लाच रकमेसह आलोसे यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन गोंदिया शहर जिल्हा गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरुआहे,आरोपीच्या अंग झडती मध्ये मिळुन आलेल्या वस्तू- रोख रूपये ३५५००/-
सॅमसंग कंपनी चा मोबाईल फोन.
सदर फोनचे परीक्षण करून पुढील तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.
आरोपी ची घर झडती घेणे सुरू आहे.
सदरची कारवाई डॉ. दिगंबर प्रधान  पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र,नागपूर,
सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र.
संजय पुरंदरे,
अपर पोलीस अधीक्षक
ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र अधिकारी
विलास काळे
पोलीस उप अधिक्षक
राजीव कर्मलवार
पोलीस निरीक्षक
उमाकांत उगले
पोलीस निरीक्षक स.फौ.चंद्रकांत करपे, पो. हवा. मंगेश काहालकर, ना.पो.शि. संतोष शेंडे, संतोष बोपचे,अशोक कापसे, म.ना.पो.शि.संगीता पटले,रोहिणी डांगे, चालक नापोशि दीपक बाटबर्वे  यांनी केली 
=============          
गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य रकमेची/लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील नंबरशी संपर्क साधावा.
कार्यालय दुरध्वनी क्रं.07182251203
@ टोल फ्रि क्रं.1064

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें