सडक अर्जुनी(तालुका प्रतिनिधी):–
तालुक्यातील सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय सौंदड येथे दिनांक 28/3/25 रोज शुक्रवारला अपार आयडी विषयी पालकांच्या मार्गदर्शन सभेचे आयोजन लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक -संस्थाध्यक्ष मा.जगदीश लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयाच्या प्राचार्या मा.उमा बाच्छल, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. मनोज शिंदे, पर्यवेक्षक डी. एस. टेंभूर्णे, स.शि. सौ के. एस. काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
सभेला उपस्थित अध्यक्षांनी पालकांना अपार आयडी का गरजेची आहे? व समोर याचे काय फायदे आहेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले .तसेच विद्यालयाच्या प्राचार्या उमा बाच्छल, मा.मनोज शिंदे, स.शि. एच. एन. लेनगुरे यांनी सुद्धा अपार आयडी, शाळेची शिस्त कॉपीमुक्त अभियान याबद्दल पालकांना सविस्तर असे मार्गदर्शन केले.
सभेला मोठ्या संख्येने पालक ,व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन स.शि. एच. एन. लेनगुरे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक डी. एस . टेभूर्णे यांनी मानले.
