गोंदिया(अनिल मुनिश्वर):–
जिल्हा पारिषद अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या आरोग्य सेविकाचे कालबद्ध पदोन्नती संदर्भात अनेक प्रश्न प्रलंबित असल्यामुळे त्यांना आर्थिक समस्या साठी जिल्हा परिषदच्या पाय-या झिझवावे लागतात. त्यातल्या त्यात अनेकदा अर्ज देऊन मला 30 वर्षाची कालबद्ध पदोन्नत लागली नाही. त्या संदर्भात उपमुख्य कार्यपालन अधिकारी फरेंद्र कुतिरकर यांना अर्ज देऊन समस्यासी अवगत करण्यात आले. सविस्तर माहीती जानून घेऊन कालबद्ध पदोन्नतीची समस्यां आरोग्य विभातील अधिका-यांशी भेटून सोडविणार असल्याचे मत जिला परिषद गोंदिया चे उपमुख्य कार्यपालन अधिकारी फरेंद्र कुतिरकर यांनी सांगीतले.
तसेच PHC व TMO स्तरावर आरोग्य सेविका च्या प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यासाठी जिल्हा पारिषद वरून अनुदान पाठविण्याची व्यवस्था करावे एसी विनंती करण्यात आली.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना जिला शाखा गोंदिया चे अध्यक्ष एल यू खोब्रागडे, आरोग्य सेविका संघटनेच्या अध्यक्षा इंदुताई उके, सचिव विद्याताई अवधूत व अनेक आरोग्य सेविका होत्या…
