नरेशकुमार पातोडे यांची वनपालपदी बढती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नागपूर(अनिल मुनिश्वर):——————-
नरेशकुमार पातोडे यांची वनसंरक्षक प्रादेशिक नागपुर यांच्या आदेशानुसार वनरक्षक गट क संवर्गातुन वनपाल गट क संवर्गात पदोन्नती व पदोन्नतीने पदस्थापना क्षेत्र सहाय्यक मासुलकसा,वनपरिक्षेञ डोंगरगांव वन्यजीव येथे झालेली आहे. त्याअगोदर वनरक्षक विशेष सेवा वनपरिक्षेञ नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे कार्यरत होते.वनपालपदी पदोन्नतीने पदस्थापना क्षेञ सहाय्यक मासुलकसा डोंगरगांव वन्यजीव येथे झाल्याने वनपरिक्षेञ नागझिरा वन्यजीव अभयारण्य साकोली यांच्या कार्यालया मार्फत नरेशकुमार पातोडे यांचे सत्कार व निरोप संभारंभाचा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात वनरिक्षेञ अधिकारी कु.आयुशा लांबट यांनी स्टार लाऊन केले. त्यानंतर पुष्पगुछ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कु.आयुशा लांबट वनपरिक्षेञ अधिकारी नागझिरा प्रमुख पाहुने लिपिक बोरकरजी न. ना. व्या. रा. साकोली तसेच खेमराज घरडे लेखापाल वनरक्षक आरती बिसेन, प्रियंका पटले अनिल भंडारी, स्वाती नंदागवळी धर्मेंद्र शामकुल वाहनचालक, ऑपरेटर अमित वलथरे, मंगेश निर्वाण, धनंजय पटणे, प्रियंका बढवाईक वनरिक्षेञ अधिकारी व वनर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन व आभार वनरक्षक आरती बिसेन यांनी केले.

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें