गोंदिया(अनिल मुनिश्वर):——————-
1. आज दिनांक 08 जुलै रोजी भारतीय हवामान खात्याने गोंदिया जिल्ह्यात ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे.
2. आज दि. 08/07/2025 ला जिल्ह्यातील सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
3. जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण सरासरी 110.6 मीमी (अतिवृष्टीची) नोंद करण्यात आली आहे.
4. आज दुपारी 1.00 ते 2.00 वा. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे गेट उघडण्यात येतील. बाघ नदी काठावरील नागरिकांनी कृपया सावधगिरी बाळगावी.
5. आज दुपारी 12.00 वा. मध्य प्रदेश येथील शिवनी जिल्ह्यातील संजय सरोवर धरणाचे 02 गेट 01 मिटर उंचीवर म्हणजे 3 फूट उंचीवर सुरू करण्यात आले आहे. वैनगंगा नदी काठावरील सर्व नागरिकांनी कृपया सावधगिरी बाळगावी.
