21 सप्टेंबरला 25 ला गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसींचा भव्य मोर्चा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडकअर्जुनी(निखिल मुनिश्वर):—————ओबीसी संघर्ष कृती समिती तसेच कुणबी समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 8 सप्टेंबर 25 ला बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाने देऊ नये त्याचप्रमाणे मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करू नये याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने ओबीसीवर अन्यायकारक असा 02/09/2025 चा जो जीआर काढलेला आहे की मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत त्याच्या निषेधार्थ 21/09/2025 ला जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे ओबीसी समाजातर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे त्याबद्दल नियोजन कसे असायला पाहिजे याबाबत माननीय बबलू भाऊ कटरे जिल्हा अध्यक्ष ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया,कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष अनिल मुनिश्वर, दिनेश हुकरे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
यावेळी मंचकावर नगरसेवक देवचंद तरोने,टीकाराम भेंडारकर,माधव तरोणे,पुष्पाबाई खोटेले,राजश्री खोटेले,भूमेश्वर शेंडे, जितू शहारे,प्रल्हाद कोरे,भूषण कोरे,राजेश कोरे,दिनेश कोरे,तुका राने,जितेंद्र ब्राह्मणकर,अरविंद मेंढे,योगराज दोनोंडे,अनिल बावणे व मोठ्या संख्येत ओबीसी बांधव उपस्थित होते

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें