सडक अर्जुनी(निखिल मुनिश्वर):- मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये तसेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याबाबत आज दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी सडक अर्जुनी तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष दिनेश हुकरे यांच्या अध्यक्षतेत तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या संभाव्य निर्णयाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कुणबी समाज व ओबीसी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येत असून महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दोन सप्टेंबर रोजी काढलेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय क्रमांक सीबीसी 2025/प्र. क्र. 129 /मावक, दिनांक 2 सप्टेंबर 2025 अन्वये हैदराबाद मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत काढलेला निर्णय हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे तसेच पुन्हा सरकारने सगेसोयरेच्या माध्यमातून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचे काम झालेले आहे तो शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा याकरिता आज चार सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करून मागणी करण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनावर आम्हाला चिंता आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कोणताही निर्णय घेतल्यास त्याचा थेट परिणाम ओबीसी समाजावर होणार आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला असवैधानिक पद्धतीने ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या विरोधात आहोत यामुळे ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा येईल याची सरकारने काळजी घेत सदर निर्णय मागे घ्यावे अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात येत आहे. शासनाने मराठा आंदोलकांच्या दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नये आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे रक्षण करावे आणि दोन सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय त्वरित रद्द करावा तसेच आमच्या मागण्यांचा विचार न झाल्यास भविष्यात रस्त्यावर उतरून विराट मोर्चा आणि आमरण उपोषण करण्याची तयारी केली असून ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण करणे हे शासनाचे कर्तव्य असून शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे यावेळी ओबीसी संघटनेचे अनिल मुनिश्वर,टिकाराम भेंडारकर,देवचंद तरोने, गंगाधर परशुरामकर, राजेश मुनिश्वर, रोशन बडोले डी.टी.बावनकुळे,राजेश हुकरे,अरविंद मेंढे,हेमराज मेंढे,अंजली मुनीश्वर,मोहीनी डोये, राजेश कटाने,मधुसूदन दोनोळे,चिलिया ब्राह्मणकर,प्रभाकर भेंडारकर,वृंदा भेंडारकर,स्वप्निल ब्राह्मणकर,राजेश कोरे,अंकित भेंडारकर धनीराम पातोडे, योगराज दोनोळे,किशोर शेंडे, लीलाधर हेमने,ईश्वर कोरे, यशवंत दोनोळे,देवराम हेमने,अनिल खोटेले, सुनील खोटेले, हेतराम खोटेले दीनदयाल बोलके व बहुसंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते…
