गोंदिया(अनिल मुनिश्वर):दि.01/07/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया येथील पथक पोलीस ठाणे गोरेगांव हद्दीत पेट्रोलीग करीत असतांनी गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहिती मिळाली कि मोटार सायकल चोरीचा सराईत गुन्हेगार सुनिल राहांगडाले रा.हिरापुर हा चोरीची मोटार सायकल विक्रीच्या ईराद्याने कु-हाडी गावाच्या परीसरात फिरत आहे.या माहीतीच्या आधारे पोलीस पथक गस्त करीत असतांनी कु-हाडी ते हिरापुर रस्त्यावर सुनिल राहांगडाले रा.हिरापुर हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटार सायकलसह दिसुन आला.त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यास ताब्यात घेवुन अभिलेखावरील मोटार सायकल चोरीचा मोटर सायकल बाबत विचारपुस केले असता त्याने माहे एप्रील/२०२५ ते जून २०२५ दरम्यान राजनांदगांव, हिवरा (गोंदिया), सालेकसा येथून एकूण ४ मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले व कबुली दिली. त्याच्या ताब्यातुन १) हिरो कंपनीची स्प्लेडर प्रो. मो.सा. काळ्या रंगाची किं. अ. 60,000/- रु २) हिरो होण्डा कंपनीची स्प्लेडर प्लॅस मो.सा. काळ्या रंगाची किं. अ. 55,000/- रु. ३) हिरो कंपनीची एच.एफ. डिलॅक्स मो.सा. काळ्या रंगाची किं. अ. 70,000/- रु. ४) हिरो होण्डा पॅशन प्रो. काळ्या किं. अ. 50,000/- रु अशा एकुण 2,35,000/- रूपये किंमतीची ४ मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी एक हिरो कंपनीची स्प्लेडर प्रो मोटार सायकल पोलीस ठाणे सालेकसा अप.क्रं. २७४/२०२५ कलम 303(2) भा.न्या.सं. गुन्हयात चोरीस गेलेली मो.सा. असल्याचे सदर आरोपी यास पुढील तपासकामी पोलीस स्टेशन सालेकसा येथे स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शना खाली सपोनि.धिरज राजुरकर , पो.हवा.विठ्ठलप्रसाद ठाकरे,पो.हवा.सुबोधकुमार बिसेन,पो.हवा.इंद्रजित बिसेन,,पो.हवा.प्रकाश गायधने, पो.हवा.दुर्गेश तिवारी, पो.शि. हसंराज भांडारकर,छगन विठ्ठले, चापोशी राम खंदारे यांनी केली आहे.
