Search
Close this search box.

आ.राजकुमार बडोले यांची नुकसानग्रस्त भागाला भेट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर)( ७ जुन ) :–
#######₹₹₹###############
मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यात घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आज धानोरी व टेमनी या गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणी दरम्यान आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोलेनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या व तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.नुकसान भरपाई तात्काळ देण्याबाबत सबंधित अधिकाऱ्यांना सुचना केल्या.तसेच महावितरणच्या अडचणी आणि इतर समस्यांचे निराकरणही करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, उपसभापती निशा काशिवार,जि.प.सदस्या सुधा रहांगडाले,माजी सभापती संगीता खोब्रागडे, कृ.ऊ.बा.स.सभापती अविनाश काशिवार,डि.यु. रहांगडाले,सरपंच चेतन पटले,सरपंच वासनिक, मंडळाध्यक्ष विलास बागडकर,गौरेश बावनकर,मनोहर काशिवार,तुकाराम ठाकरे,तेजराम खोब्रागडे,महेश पटले,नायब तहसीलदार जांभुळकर,मंडळ अधिकारी, तलाठी,कृषी सहाय्यक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

जनतेच्या आमदाराचा ५५ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा —५५ दिव्यांगांना ई-रिक्षा भेट,५५ जणांनी केलं रक्तदान,५५ जणांना दिल्या कानाच्या मशीन,हजारो लोकांची उपस्थिती, शुभेच्छा देताना वही,पुस्तके आणि झाडांची दिली भेट

महाराष्ट्रात सर्वप्रथम गोंदिया तालुक्यात ६५० लाभार्थ्यांना वितरित झाले १३०० ब्रास वाळूचे रॉयल्टी पास सामान्य नागरिकांना दिलासा,प्रक्रियेत सुधारणा आणि प्रशासनाच्या कार्यकुशलतेचे उत्कृष्ट उदाहरण

जनतेच्या आमदाराचा ५५ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा —५५ दिव्यांगांना ई-रिक्षा भेट,५५ जणांनी केलं रक्तदान,५५ जणांना दिल्या कानाच्या मशीन,हजारो लोकांची उपस्थिती, शुभेच्छा देताना वही,पुस्तके आणि झाडांची दिली भेट