सडकअर्जुनी(अनिल मुनिश्वर):-
##########################
आधुनिकीकरण आणि वाढत्या शहरीकरणामुळे जंगलांचे प्रमाण कमी झाले.ग्लोबल वार्मिंग मुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे.भावी पिढीसाठी शुद्ध पर्यावरण द्यायचे असेल तर प्रत्येकाने एक झाड लावण्याचा प्रण केला पाहिजे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण समृद्धीसाठी ” एक पेड माँ के नाम ” या अभियानांतर्गत सडक अर्जुनी नगरपंचायतच्या वतीने नगरपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. नगराध्यक्ष तेजराम मडावी यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या कार्यक्रमात उपाध्यक्ष वंदना डोंगरवार सभापती आनंदकुमार अग्रवाल,नगरसेवक देवचंद तरोने,अंकित भांडारकर,नगरसेविका दीक्षा भगत,शशिकला टेंभुर्णी,शाहिस्ता शेख, कामिनी कोवे,सायमा शेख,नगरपंचायत चे प्रशासकीय अधिकारी युगलकुमार दडेमल,कर निर्धारण अधिकारी अनुपम वाघमारे,अनिल पवार,स्वच्छता अधिकारी योगेश देशमुख,हितेश हुकरे,नंदू गहाणे,आशिष कापगते,रमेश लांजेवार,तेजराम खोटेले,सुशील तागडे,श्रेयस राऊत,विलास गहाणे, रमेश वैकुंठी,परसराम सूर्यवंशी,निक्की पठाण,माकडे व इतर नगरसेवक तसेच कर्मचारी उपस्थित होते.
