Search
Close this search box.

एक पेड माँ के नाम’ अंतर्गत विविध झाडांचे लागवड,शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदियाचा पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक उपक्रम,पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या हस्ते वृक्षारोपण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनिश्वर):-
***************************
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गोंदिया जिल्हा प्राथमिक सहकारी पतसंस्था मर्यादित 1 द्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विविध झाडांची लागवड करण्यात आली.यावेळेस जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल 100 पेक्षा जास्त झाडांची लागवड परिसरात करण्यात आली.
गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदिया शिक्षकांच्या आर्थिक हितासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासणारी सहकार क्षेत्रातील आर्थिक संस्था आहे. मागच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून भव्य अवयवदान शिबिर शिक्षक पतसंस्था गोंदिया येथे आयोजित केले.जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शेकडो झाडांची लागवड संस्थेकडून पोलीस अधीक्षक परिसरात एक पेड धरती मा के नाम उपक्रमांतर्गत करण्यात आले.यावेळी समाजासमोर आदर्श निर्माण करण्याचे काम प्राथमिक शिक्षक बांधवांनी या उपक्रमाच्या माध्यमातून केले आहे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे व सहाय्यक पोलीस अधीक्षक नंदिनी चांपुरकर यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर डोंगरवार,उपाध्यक्ष अशोक बिसेन,संदीप तिडके,गौतम बांते,विनोद बडोले, शोभेलाल ठाकूर,दिलीप लोदी,राजेंद्र बोपचे,उमेश रहांगडाले,सतीश दमाहे,राजेश रामटेके,सौ.भारती तिडके,कुमारी नीतू डहाट,व्यवस्थापक ज्योतीप्रकाश गजभिये यासह पतसंस्थेमधील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

जनतेच्या आमदाराचा ५५ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा —५५ दिव्यांगांना ई-रिक्षा भेट,५५ जणांनी केलं रक्तदान,५५ जणांना दिल्या कानाच्या मशीन,हजारो लोकांची उपस्थिती, शुभेच्छा देताना वही,पुस्तके आणि झाडांची दिली भेट

महाराष्ट्रात सर्वप्रथम गोंदिया तालुक्यात ६५० लाभार्थ्यांना वितरित झाले १३०० ब्रास वाळूचे रॉयल्टी पास सामान्य नागरिकांना दिलासा,प्रक्रियेत सुधारणा आणि प्रशासनाच्या कार्यकुशलतेचे उत्कृष्ट उदाहरण

जनतेच्या आमदाराचा ५५ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा —५५ दिव्यांगांना ई-रिक्षा भेट,५५ जणांनी केलं रक्तदान,५५ जणांना दिल्या कानाच्या मशीन,हजारो लोकांची उपस्थिती, शुभेच्छा देताना वही,पुस्तके आणि झाडांची दिली भेट