गोंदिया(अनिल मुनिश्वर):-
AAAAAAAAGGGGGGGGMMMMMMM
जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे २६ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन परिसरातील गणमान्य नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यात महिला प्रभाग संघ सभागृह बांधकाम १५ लक्ष रुपये, कुणबी समाज परिसरामध्ये रंगमंच व पेविंग ब्लॉक बसविणे ७ लक्ष रुपये तसेच गावांतर्गत सिमेंट नाली बांधकाम करणे ४ लाख रुपये इत्यादी कामे प्रस्तावित आहेत.
या याप्रसंगी कार्यक्रमाला प्रामुख्याने चेतनजी वडगाये सभापती पंचायत समिती सडक अर्जुनी,निशाताई तोडासे सदस्य जिल्हा परिषद गोंदिया,वर्षाताई शहारे सदस्य पंचायत समिती,हर्ष मोदी सरपंच ग्रामपंचायत सौंदड,उपसरपंच रोशन शिवणकर, ग्रामपंचायत सदस्य शुभम जनबंधू,समाधान बडोले,खुशाल ब्राह्मणकर,प्रमिला निर्वाण,सुषमा राऊत,रंजना भोई ,विनयजी भेंडारकर अध्यक्ष कुणबी समाज,शामरावजी शिवणकर माजी पंचायत समिती सदस्य,नरेश शिवणकर,अरविंद मेंढे,अस्मिता मेंढे,अमोल शेंडे,सुभाष टेंभुर्णे,आशिष राऊत,वृषभ राऊत,माधुरी यावलकर,भूमेश्वर शिवणकर ,योगेश्वरी निर्वाण, रेखा राऊत,सीमा निंबेकर, अर्चना डोंगरवार ,अनिल मेश्राम, राहुल शिवणकर, विजयकुमार डोये, मयूर डोये, मारवाडेजी ,गुणवंता तागडे, सुनील डोये तसेच इतर मान्यवर व खूप मोठ्या संख्येने महिला मंडळी व पुरुष मंडळी उपस्थित होते.
