गोंदिया(अनिल मुनीश्वर):-
बौद्ध धर्म हा कर्मावर आधारित आहे. या धर्मात हिंसा नावाची कुठलीही गोष्ट नसून भगवान बुद्ध यांनी जगाला अहिंसा, दया, करुणा हा संदेश दिला आहे. विश्व सेवा करण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करायला हवे, असे प्रतिपादन माऊली फाउंडेशन गोंदियाचे अध्यक्ष इंजि. आनंद लक्ष्मणराव चंद्रिकापुरे यांनी केले.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनि तालुक्यातील शेंडा येथे बौद्ध जयंती निमित्त आयोजित प्रबोधन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते
आनंद चंद्रिकापुरे पुढे म्हणाले की महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सुंदर असे संविधान भारत देशाला दिले आहे. या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. समता बंधुत्व न्याय या तत्त्वप्रणालीवर आपल्या देशाचा संविधान आधारित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्म देऊन आमचे जीवनमान उंचावण्याचे काम केले आहे. प्रत्येकाने सिद्धार्थ गौतम बुद्धांचे विचार अंगीकार करावे असे आव्हान यावेळी इंजिनीयर आनंद चंद्रिकापुरे यांनी केले
