गोंदिया(अनिल मुनीश्वर):-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सडक अर्जुनी तालुका OBCअध्यक्षपदी शिवाजी गहाणे यांची निवड करण्यात आली. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार माननीय प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते आज दिनांक ११ मे रोजी गोंदिया येथे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
शिवाजी गहाणे हे सडक अर्जुनी पंचायत समितीचे सदस्य असून, ते पक्षनिष्ठ, जमीनीवर कार्य करणारे ओबीसी नेते म्हणून परिचित आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेत माननीय प्रफुल पटेल व जिल्हा अध्यक्ष माननीय राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.
या कार्यक्रमावेळी जिल्हा ओबीसी अध्यक्ष किशोर तरोणे,माजी उपाध्यक्ष यशवंत गणवीर,जिल्हा सहकारी बँकेचे संचालक भोजराम रहेले तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे उपस्थित होते.
नियुक्तीनंतर बोलताना शिवाजी गहाणे म्हणाले, “पक्षाकरीता मी आजवर जे कार्य केले त्याची दखल घेत मला ही संधी दिली याबद्दल मी प्रफुल पटेल व राजेंद्र जैन यांचा आभारी आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे कार्य करीन.”
—
