सडक अर्जुनी(निखिल मुनीश्वर):————–
कुणबी समाजाची कोजागिरी आता समाजाला एकत्र करण्यासाठी एक समाज माध्यम ठरले आहे. कुणबी बांधव एकत्र येऊन कौटुंबिक सामाजिक वैवाहिक जीवनाची जीवनाची हितगुज करण्याची माध्यम आहे. असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले आहे .
कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष अनिल मुनिश्वर,सचिव दिनेश हुकरे यांच्या नेतृत्वात कुणबी समाज संघटने च्या वतीने सडक अर्जुनी पंचायत समिती समोरील कुणबी समाज भवन परिसरात कोजागिरी स्नेहमिलन व स्नेहभोजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार व पुष्प अर्पण करून करण्यात आली . यावेळी हरिभक्त परायण समीरदादा कोरे यांचे समाजप्रबोधन पर कीर्तनाला सुरुवात करण्यात आली .
याप्रसंगी जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर,सौ. शुभांगी सुनील मेंढे नगरसेवक देवचंद तरोने अंकित भेंडारकर,पंचायत समिती सदस्य डाँ.रुकीराम वाढई, सरपंच माधव तरोने, अरुण डोये,ईश्वर कोरे,राजेश कठाणे, मधुसूदन दोनोळे, राजेश मुनिश्वर, अंजली मुनिश्वर माधुरी पातोळे,अंजली डोये,पुष्पा खोटेले,देवानंद कोरे,रमेश मेंढे, सचिन फुंडे,भूषण कोरे, गजानन राखडे , पाऊलझगडे,प्रल्हाद कोरे,किशोर शेंडे, तुलसीदास शिवणकर, अरविंद मेंढे, निखिल मुनिश्वर, व हजारोच्या संख्येत कुणबी, समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटनेचे अध्यक्ष अनिल मुनिश्वर तर संचालन दिनेश हुकरे,सचिन फुंडे, आभार अरुण डोये यांनी मानले.
