सडकअर्जुनी(अनिल मुनिश्वर):—————-
तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डोंगरगाव ( ख.) येथे दिनांक 26 जून 2025 ला छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून शाळेत राजश्री शाहू महाराज विद्यार्थी बचत बँकेचे शुभारंभ करण्यात आला. नवीन वर्ग खोलीचे उद्घाटन करण्यात आले तसेच पालक सभा बोलावून शाळेत आई-बाबांचा आशीर्वाद हा नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई-बाबांचे पाय धुवून तिलक करून त्यांच्या आशीर्वाद घेतले. कार्यक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास 85% च्या वर पालक वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद क्षेत्र डव्वाचे सदस्य डॉ. भुमेश्वरजी पटले तर कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समिती सदस्य चेतनभाऊ वडगाये होते. प्रमुख अतिथीस्थानी ग्रामपंचायत सरपंच डॉ. सौ. पौर्णिमाताई गणवीर उपसरपंच, ज्ञानेश्वरजी खोटेले, सदस्य अर्चनाताई ब्राह्मणकर, प्रभाताई रामटेके, उषाताई डोये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निकेशजी भेंडारकर, उपाध्यक्ष दिव्याताई चौधरी, सदस्य दौलतजी खोटेले, रोशनजी खोटेले, मंजुषाताई डोये, ममताताई चाचरे, कविताताई इळपाते मुख्याध्यापक एम. व्ही. येरणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन वाय. बी. कापगते यांनी केले तर पाहुण्यांचे आभार राजेश शेन्डे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चचाणे सर, रजनी मेश्राम मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले.
