गोंदिया(अनिल मुनिश्वर):– (०४ जून)
**************************
गोंदिया विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विनोद अग्रवाल यांनी त्यांचा ५५ वा वाढदिवस नेहमीप्रमाणे समाजहितासाठी, विशेषतः दिव्यांग बंधू-भगिनींसोबत साजरा करत एक वेगळीच उदाहरण घालून दिले.
“जनतेचे आमदार” म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार विनोद अग्रवाल हे केवळ नावापुरतेच जनतेचे आमदार नाहीत,तर जनतेसाठी सतत समर्पित कार्य करत असल्यानेच ही उपाधी त्यांना मिळाली आहे.
आज ४ जून रोजी फुलचूर येथील लकी लॉनमध्ये मोठ्या उत्साहात आणि हजारो लोकांच्या साक्षीने आमदार विनोद अग्रवाल यांचा ५५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.या विशेष प्रसंगी सर्वपक्षीय, सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार विनोद अग्रवाल यांनी ५५ दिव्यांगांना बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षा भेट दिल्या आणि प्रेमाने त्यांना आलिंगन दिले.त्याचप्रमाणे ५५ गरजू व्यक्तींना कानाच्या मशीन भेट दिल्या, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात नवी आशा निर्माण झाली. गोंदिया जिल्ह्यातील सर्व तहसीलमधून २-२ दिव्यांगांना ई-रिक्षा देण्यात आल्या.
या प्रसंगी आमदार विनोद अग्रवाल म्हणाले,”आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आहे.दिव्यांग बांधवांना ई-रिक्षा आणि श्रवणयंत्र देताना त्यांच्या चेहऱ्यावरची आनंदाची भावना माझ्यासाठी ऊर्जा निर्माण करणारी आहे.दिव्यांगांना मदत करणे हे देवकार्य आहे आणि हे कार्य मी आयुष्यभर करत राहीन.“वाढदिवसाच्या दिवशी लकी लॉन येथे पुष्पगुच्छ किंवा इतर भेटवस्तूंऐवजी रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.याला प्रतिसाद देत ५५ मित्रांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा ब्लड बँक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले.
या विशेष दिवशी गोंदिया विधानसभा आणि संपूर्ण जिल्ह्यातून हजारो नागरिकांनी उपस्थित राहून आमदार विनोद अग्रवाल यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व यशस्वी राजकीय आयुष्यासाठी शुभाशीर्वाद दिला.
