गोंदिया(अनिल मुनीश्वर):-
@@@@@@@@@@@@@@@@@@@
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील साजा क्रमांक 17 चिखली येथील ग्राम महसूल अधिकारी वर्ग 3 कु.अश्विनी शंकर ठोंबरे वय 24 वर्षे राहणार रांजोना पो. खांडेगाव ता.वसमत जिल्हा हिंगोली सध्या सडक अर्जुनी येथे गजानन राखडे यांच्या घरी किरायाने रहात असून दुसरा आरोपी खाजगी इसम ओमकार ताराचंद शेंडे वय 52 वर्षे राहणार कोहळीटोला पोस्ट चिखली तालुका सडक अर्जुनी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा कारवाई करून आठशे रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले पकडले.
सविस्तर असे कि, यातील तक्रारदार हे चाळीस वर्षीय शेतकरी असून त्यांची आई दिनांक 14/11/2023 रोजी मरण पावली असून तिचे नावाने असलेली मौजा चिखली येथील सर्वे क्रमांक 536/1/ब शेत जमिनीचे सात बारा उता-यावर तक्रारदार व त्यांचे भाऊ बहीणी यांच्या नावांची नोंद घेण्यासाठी आरोपी लोकसेवक रु .1000/-लाच मागत असल्याबाबत
तक्रारदार यांनी ला.प्र.वि.कार्यालय गोंदिया येथे आठ मे 2025 ला तक्रार दिली.लाच मागणी पडताळणी दरम्यान तडजोडीअंती आरोपी लोकसेवक ठोंबरे व शेंडे यांनी तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष 800/-रुपये लाच रकमेची मागणी करुन लाच स्वीकारण्याची
तयार दर्शवीली.
▶️सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवकांनी पंचासमक्ष 800/- रू. लाच रक्कम ईशारा करुन आरोपी क्रमांक 2 यांचेकडे देण्यास सुचीत केले. आरोपी क्रं 2 याने पंचासमक्ष तलाठी साजा क्रमांक 17 चिखली येथे आठ मे 2025 रोजी लाच रक्कम स्वीकारली .लाच रकमेसह दोन्ही अरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन डुग्गीपार जिल्हा गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्यात आली .
▶️ आरोपी लोकसेवक यांचे अंग झडती मध्ये मिळुन आलेल्या वस्तू- रोख रूपये 250/-
Oneplus कंपनी चा मोबाईल फोन.
आरोपी खाजगी इसम याचे अंगझडती मधे लाच रक्कम 800/- रु व रोख रु 1800 तसेच कोपो कंपनीचा मोबाइल फोन मिळुन आला आहे.
सदर दोन्ही फोनचे परीक्षण करून पुढील तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.
आरोपी ची घर झडती घेणे सुरू आहे.कारवाई
लाचलुतपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान नागपूर,अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम नागपूर परिक्षेत्र.
अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे नागपूर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनात
सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक उमाकांत उगले,ला.प्र.वि.गोंदिया स.फौ.चंद्रकांत करपे, पो. हवा. संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, ना.पो.शि. संतोष शेंडे, संतोष बोपचे,अशोक कापसे, कैलाश काटकर, प्रशांत सोनवणे म.ना.पो.शि. संगीता पटले , रोहिणी डांगे, चालक नापोशि दीपक बाटबर्वे यांनी केली
=============
गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य रकमेची/लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील टोल फ्री क्रमांक 1064 या नंबरशी संपर्क साधावा.
@ टोल फ्रि क्रं. 1064
==================
