सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर):-
#############################
तालुक्यातील सौंदड लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वशरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालय ,सौंदड येथील जवळपास सर्व शिक्षकांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म.रा.पुणे द्वारा शिक्षक क्षमता समृध्दी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहेत.तरी सुद्धा विद्यालयातील शिक्षकांना याबाबत भरपूर ज्ञान मिळावे यासाठी NEP 2020अभ्यासक्रमबाबत मार्गदर्शन व समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था सौंदड यांनी माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लोहिया शिक्षण संस्थेचे. सहसचिव मा.  एम. एन. अग्रवाल, प्राचार्या मा. उमा बाच्छल, मा. गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मा एम. के. शिंदे, पर्यवेक्षक मा.डी. एस.टेंभुर्णे, प्राध्यापक मा. आर .एन. अग्रवाल उपस्थित होते.
        मा.जगदीश लोहिया,संस्थापक – संस्थाध्यक्ष, लो.शि.संस्था,यांनी  NEP 2020अभ्यासक्रमबाबत शिक्षकांना परिपूर्ण मार्गदर्शन व्हावे यासाठी नागपूर येथील डॉ .प्रज्ञा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली.डॉ .देशपांडे यांनी NEP 2020 अभ्यासक्रमबाबत व त्याच्या अंमलबजावणीबाबत शिक्षकांना विस्तृत मार्गदर्शन केले.तसेच संस्कृत भाषेचे महत्त्व विविध दृष्टीने पटवून दिले.
या मार्गदर्शन वर्गाचा लाभ सस्थेअंतर्गत सर्व विद्यालयाच्या शिक्षकांनी घेतला.
 
				 
								 
															









