सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर):-
============================
तालुक्यातील लोहिया शिक्षण संस्था, सौंदड द्वारा संचालीत रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक (कला व विज्ञान) विद्यालय, सौंदड येथील फेब्रुवारी/मार्च-2025च्या विभागीय शिक्षण मंडळ, नागपुर द्वारा पार पडलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दिनांक 5 मे 2025 ला घोषित करण्यात आला.
विज्ञान शाखा निकाल
उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयातील विज्ञान शाखेतून एकूण 80 विद्यार्थी प्रविष्ठ झाले व सर्वच 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे. यापैकी
प्रथम श्रेणीत-18
द्वितीय श्रेणीत-60
तृतीय श्रेणीत – 2
अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले आहे. दरवर्षीप्रमाणे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. त्यामध्ये
कु.प्रिया नरेश इरले – 74%,
सागर संजय चांदेवार – 73.67%
धीरज पुरुषोत्तम भिवगडे – 72%,
कु. भूमेश्वरी एकनाथ भुसारी – 68.50%
कु. चंदा मार्कंड मेश्राम – 68%
आय.टी. विषयाचा 100% निकाल*
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आय.टी. विषयाचे ज्ञान मिळावे व त्यांना विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धा करता यावी या उदात्त हेतूने संस्थापक-संस्थाध्यक्ष मा.जगदीश लोहिया यांनी आय.टी. विषयासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचाच परिणाम मंडळाच्या फेब्रू.-2025 परीक्षेत दिसून येत आहे.
आय.टी विषयात विशेष प्राविण्य मिळविणारे विद्यालयातील 19 विद्यार्थी. त्यापैकी गुणानुक्रमे विद्यार्थी
धीरज पुरुषोत्तम भिवगडे- 98 गुण
कु.रागिनी विलास भिवगडे -96गुण
दीपक अरविंद चांदेवार – 95 गुण
कु.लीना अरुण यावलकर- 95 गुण
मोहित महेश डुभंरे- 95 गुण
तारेश विजय कोरे -95 गुण
या विद्यार्थ्यांनी वरीलप्रमाने गुण प्राप्त करून आय. टी. विषयात विशेष यश मिळविले आहे.
कला शाखा निकाल
विद्यालयातील कला शाखेत एकूण 63 विद्यार्थी मंडळ परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी एकूण 50 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 79.36% लागला आहे. यामध्ये
1)नेहा रेवचंद फुंडे – 60%
2)सागर कैलास नेवारे 58.50%
3)आदित्य जितेंद्र मोहबंशी 57.17%
यांनी विशेष यश प्राप्त केले आहे.
शाळेतील प्राविण्य मिळविणाऱ्या तसेच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक जगदीश लोहिया, संस्था सचिव पंकज लोहिया, प्राचार्या उमा बाच्छल, संस्था व विद्यालयाच्या सर्व समित्यांचे पदाधिकारी व सदस्यगण तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. संस्थापक-संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांनी ” विद्यार्थ्यांनो आपल्या स्वप्नाचा पाठलाग करून जीवनात आपले ध्येय साध्य करा.” असा संदेश देवून त्यांचे अभिनंदन केले व भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई – वडील,जगदीश लोहिया संस्थापक-संस्थाध्यक्ष लोहिया शिक्षण संस्था सचिव पंकज लोहिया, प्राचार्या उमा बाच्छल तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना दिले.
