Search
Close this search box.

कृषी सचिव व कृषी आयुक्त यांच्या समवेत कृषी संघटनांची बैठक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे:-ब्युरो चीफ(अनिल गो.मुनिश्वर):–
******************************
माननीय कृषी सचिव श्री विकासजी रस्तोगी साहेब IAS आयुक्त माननीय सुरजजी मांढरे IAS व कृषी संचालक माननीय सुनीलजी बोरकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेच्या पदाधिकारी (माफदा) व बी बियाणे उत्पादक कंपनी चे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक दिनांक 21.4.2025 रोजी कृषी आयुक्तालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे संपन्न झाली.

सुरुवातीला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सन्माननीय अधिकारी वर्गांचें यथोचित सत्कार करून निवेदन देण्यात आले यानंतर प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली .

या मीटिंग चे वैशिष्ट्य बी बियाणे उत्पादक कंपनी संघटना MASA व CIAM च्या वतीने सन्माननीय समीरजी मुळे साहेब, श्रीमान अजितजी मुळे साहेब, श्रीमान रामचंद्रजी नाके साहेब, श्रीमान रवीजी दप्तरी साहेब यांच्या समवेत MASA व CIAM संघटनेचे अन्य पदाधिकारी या बैठकी ला उपस्थित होते.

माफदा संघटनेचे अध्यक्ष मा.विनोदभाऊ तराळ, महासचिव श्रीमान विपिनजी कासलीवाल, राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष श्रीमान मनमोहनजी कलंत्री यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या वतीने आपल्या अनेक अडीअडचणी बाबत प्रश्नावली उपस्थित केली यामध्ये प्रामुख्याने
१. सारथी पोर्टल बाबर येणाऱ्या अडीअडचणी या प्रर्कशाने उपस्थित केल्या.
२ खत उत्पादक कंपन्याकडून होत असलेल्या लिंकिंग सविस्तर चर्चा करण्यात आली यामुळे आमचा खत विक्रेता फार अडचणीत आहे.

३ मागील अनेक वर्षापासून सॅम्पल चे प्रलंबित देयके.

४ POS मशीन च्या अडचणी.

५ सॅम्पल फेल बाबतची समस्या शेतकऱ्यांची तक्रार नसतानाही बियाणे फेल होते या विषयाला गंभीरतेने घ्यावे .

६ आमचे सर्व विक्रेते आपणाकडून अधिकृत परवाना दिलेल्या कंपनीचे च बियाणे व इतर कृषी निविष्ठा आम्ही विक्री करतो ते बोगस अशा शब्दांची व्याख्या मीडिया द्वारे चालवली जाते त्यावर कुठेतरी शासनाच्या वतीने बंधन आणण्यासाठी नोटिफिकेशन काढावे जेणेकरून आमच्या विक्रेत्या बांधवांची बदनामी होणार नाही.

७ कृषी व्यापार करताना आमच्याकडे मागील अनेक वर्षापासून कीटकनाशके एक्सपायर होत आहेत ते कंपनीने परत घेऊन त्याची विल्हेवाट करावी याबाबत सुद्धा संघटनेच्या वतीने प्रश्न उपस्थित करण्यात आले.

८ दुकानदार यांच्या कडून परवान्यामध्ये गोडाऊन समाविष्ट करण्यात आले नाही पण गोडाऊनमध्ये अधिकृत माल असताना व त्याची सर्व बिले असतानाही ही FIR दाखल करण्यात आल्यामुळे व्यापाऱ्यांची प्रतिष्ठा मलीन झाली हि अत्यंत गंभीर बाब आहे यापुढे अशा प्रकारे कारवाया न करता संबंधित दुकानदारास समज द्यावा अशी विनंती करण्यात आली.

९. शासना शासनाकडून घेत असलेल्या सॅम्पल ची संख्या निर्धारित करावी.

*मागील अनेक वर्षाच्या नंतरच प्रथमच राज्याचे मुख्य सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय चांगली मिटिंग संपन्न झाली*.

शासनाच्या वतीने प्रत्येक विषयावर आपल्या संघटने कडून व कृषी उत्पादक संघटने कडून सर्व अडीअडचणी वर सविस्तर म्हणणे ऐकून घेतले व विशेषतः सारथी पोर्टल खरीप हंगाम २०२५ साठी प्रायोगिक तत्त्वावर अवलंब करण्याच्या सूचना देण्यात येतील असे नमूद केले, तसेच इतर अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.
येणाऱ्या खरीप २०२५ साठी उत्पादक कंपनीच्या वतीने व कृषी निविष्ठा विक्रेता यांच्यावतीने बी बियाणे, खते, कीटकनाशके चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना देऊन हा खरीप चांगला पार पाडावा व शासनास सहकार्य करावे असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले.

प्रत्येक कृषी निविष्ठा विक्रेता हा शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करूनच चांगले निविष्ठा शेतकऱ्यांना विक्री करेल अशी ग्वाही संघटनेच्या वतीने देण्यात आली.

या मिटींगला माफदा संघटनेचे *अध्यक्ष श्री विनोदभाऊ तराळ पाटील, महासचिव श्री विपिनजी कासलीवाल, राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष मनमोहनजी कलंत्री, मुख्य सल्लागार श्री सत्यनारायणजी कासट, संघटनेचे जेष्ठ श्री सुभाषभाऊ दरक, संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष श्री कैलासभाऊ ढोळे साहेब, श्री सुरेशजी मुंदडा यवतमाळ, श्री सुनीलजी पाटील वाशिम, श्री सतीशजी मुनोत अहिल्यानगर, श्री छबुराव हराळ पाटील अहिल्यानगर, श्री गुंडप्पाजी पंच सोलापूर, श्री विठ्ठलरावजी बडोले धाराशिव, श्री राजेंद्रजी मामनिया, श्री प्रशांतजी पाटील, श्री मुकेशजी अग्रवाल गोरेगाव,श्री अनिलजी मुनिश्वर सडक अर्जुनी,श्री गजूजी गराडे,श्रीकृष्णजी पुरावार,श्री जितेंद्रजी पाटणी, श्री बालाजी जी चौगुले, श्री अनिलजी कोचर, श्री नितीनजी पाटणी, श्री निशिकांतजी पदमवार, श्री राहुलजी अग्रवाल, श्री कौस्तुभजी शिर्के, श्री रजनीकांतजी निंबाळकर, श्री प्रशांतजी पौळ, श्री कुलकर्णी साहेब,श्री गणेश शिंदे साहेब (लीगल एडवोकेट)अन्य पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें