कांकेर ट्रॅव्हल्स बस ला आग लागल्याने प्रवाशांचे मोबाईल व सामानाचे मोठे नुकसान,जीवित हानी नाही

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर):-
****************************
तालुक्यातील महामार्ग क्रमांक 53 वर फुटाळा/सौंदड गावात रेल्वे क्रॉसिंग जवळ 22 एप्रिल च्या रात्री आठ वाजता बायपास रोडवर कांकेर ट्रॅव्हल्स ची बस क्रमांक CG 04 NA 7776 रायपूर वरून हैदराबाद कडे जात असताना बसच्या मागील टायर गरम होऊन पेट घेतला त्यामुळे टायरला आग लागली व टायर फुटून बाहेर निघाला व संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली परंतु चालक के.गिरी याच्या काहीतरी जळाल्याचा वास येत असल्याचे लक्षात आल्याने व टायर पेटत असल्याचे निदर्शनास आल्याने बस त्वरित थांबवून सर्व 23 प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले काही प्रवाशांनी आपले सामान उतरवले परंतु जड सामान, मोबाईल व लगेज उतरवू न सकल्याने सर्वसामान मोबाईल आगीमध्ये जळून खाक झाल झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. आग लागल्याचे कळताच नगरपंचायत सडक अर्जुनी व नगरपरिषद साकोली अग्निशमन विभागाला तसेच पोलीस विभागाला सूचना देण्यात आली व लगेच दोन्ही विभाग आपापल्या गाड्या घेऊन आग विजवण्याचे प्रयत्न करून रात्री दहा वाजता पर्यंत आग विजविण्यात आली.
बसला आग लागल्याचे कळताच डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंगेश काळे, महामार्ग पोलीस चे पोलीस निरीक्षक प्रशांत भुते,नगरपंचायत सडक अर्जुनी चे अग्निशमन अधिकारी हितेश हुकरे व साकोली येथील नगरपंचायत चे कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचून बसची आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न केले.यात परिसरातील गावकऱ्यांच्याही मोठा सहभाग होता..

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

किसानो को सरसकट मिले नुकसान का मुआवजा, कोई भी नुकसानग्रस्त किसान मदद से वंचित ना रहे इसका विशेष ध्यान रखे – विधायक विनोद अग्रवाल, विधायक विनोद अग्रवाल ने फसलो के हुए नुकसान के लिए तत्काल पंचनामे करने के दिए निर्देश

किसानो को सरसकट मिले नुकसान का मुआवजा, कोई भी नुकसानग्रस्त किसान मदद से वंचित ना रहे इसका विशेष ध्यान रखे – विधायक विनोद अग्रवाल, विधायक विनोद अग्रवाल ने फसलो के हुए नुकसान के लिए तत्काल पंचनामे करने के दिए निर्देश