कामगारांच्या उन्नतीसाठी राज्य शासन कटिबद्ध :– आ.राजकुमार बडोले, कामगार बांधवांसाठी किचन साहित्य वाटप शिबिराचे आयोजन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर)(ता. २३ एप्रिल २०२५): –
******************************* अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने, नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी किचन साहित्य वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबिर २३, २४ व २५ एप्रिल २०२५ या कालावधीत आशीर्वाद लॉन सडक अर्जुनी येथे आयोजित करण्यात येत आहे. या शिबिराची सुरुवात आज आमदार राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
याप्रसंगी बोलताना आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थित कामगार बांधवांना मार्गदर्शन करत कामगार कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्य शासन कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध असून, शैक्षणिक सहाय्य, आरोग्य योजना, अपघात विमा, गृहकर्ज सहाय्य, तसेच घरगुती वापरासाठी किचन साहित्याचे वाटप यांसारख्या योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत.
या शिबिरादरम्यान पात्र व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आवश्यक किचन साहित्याचे वाटप करण्यात येत असून,हा उपक्रम कामगार कल्याणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे, असेही त्यांनी नमूद केले. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना थेट लाभ मिळणार असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार बडोले यांनी व्यक्त केला.
यावेळी सडक अर्जुनी पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, गोरेगाव पंचायत समिती सभापती चित्रलेखा चौधरी, उपसभापती रामेश्वर महारवाडे, तहसीलदार इंद्रायणी गोमासे, पंचायत समिती उपसभापती निशा काशिवार, जिल्हा परिषद सदस्य भूमेश्वर पटले, कविता रंगारी, सुधा रहांगडाले, माजी सभापती गिरधारी हत्तीमारे, पं सं सदस्य संगीता खोब्रागडे, शालिंदर कापगते, शिवाजी पाटील गहाणे, वर्षा शहारे, अविनाश काशिवार, राजेश कठाने, विलास बागडकर, डी. यू. रहांगडाले, रजनी गिरेपुंजे, रमेश चुऱ्हे, लक्ष्मीकांत धानगाये, तुकाराम राणे, रंजना भोई, हितेश डोंगरे, लोकचंद कापगते आदी मान्यवर, स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते.

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

किसानो को सरसकट मिले नुकसान का मुआवजा, कोई भी नुकसानग्रस्त किसान मदद से वंचित ना रहे इसका विशेष ध्यान रखे – विधायक विनोद अग्रवाल, विधायक विनोद अग्रवाल ने फसलो के हुए नुकसान के लिए तत्काल पंचनामे करने के दिए निर्देश

किसानो को सरसकट मिले नुकसान का मुआवजा, कोई भी नुकसानग्रस्त किसान मदद से वंचित ना रहे इसका विशेष ध्यान रखे – विधायक विनोद अग्रवाल, विधायक विनोद अग्रवाल ने फसलो के हुए नुकसान के लिए तत्काल पंचनामे करने के दिए निर्देश