Search
Close this search box.

आ.विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने ९,१० व ११ जून रोजी भव्य जन सेवा शिबिर — विविध योजनांचा मिळणार थेट लाभ अधिकाधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा:-आ.विनोद अग्रवाल यांचे आवाहन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनिश्वर):-
****************************
छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत गोंदिया विधानसभा क्षेत्रात ९,१० व ११ जून २०२५ रोजी भव्य जन सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ग्रीनलँड लॉन, रिंग रोड, गोंदिया येथे सकाळी १०:०० ते सायंकाळी ४:०० या वेळेत होणार आहे.
या शिबिरात केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ पात्र नागरिकांना मिळणार आहे. आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून लगेचच लाभ मंजूर करण्यात येणार आहे.
प्रमुख योजना ज्या अंतर्गत लाभ मिळेल:
✅संजय गांधी निराधार योजना – ₹१५०० प्रतिमाह (वृद्ध, विधवा, दिव्यांगांसाठी)
✅श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजना – ₹१५०० प्रतिमाह (६५ वर्षांवरील नागरिकांसाठी)
✅राष्ट्रीय कुटुंब सहाय्यता योजना – ₹२०,००० एकरकमी
✅सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना – ₹२२५० प्रतिमाह (० ते १८ वयोगटातील पित्याशिवाय किंवा मातेशिवाय मुले)
✅प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
✅गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना
✅फळबाग लागवड योजना
✅प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना
✅कृषी यंत्रीकरण योजना
✅राष्ट्रीय कृषी विकास योजना
✅एकात्मिक फलोत्पादन योजना
✅भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
✅राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – डाळिंब/कडधान्य
✅अग्रीस्टेक शेतकरी (Farmer ID)
✅रेशन कार्ड संबंधित सर्व कामे
✅७/१२ वारस नोंदणी
✅आपसी वाटणी पत्र
✅जिवंत ७/१२ मिळवणे
✅नवीन मतदान ओळखपत्र
✅उत्पन्न प्रमाणपत्र
✅नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्र
✅डोमिसाइल (स्थायिकता प्रमाणपत्र)
✅जात प्रमाणपत्र
✅EWS प्रमाणपत्र

शिबिर दिनांकनिहाय कार्यक्रम :
९ जून २०२५ – दासगाव व रावणवाडी मंडळातील सर्व गावांसाठी
१० जून २०२५ – खमारी व कामठा मंडळातील सर्व गावांसाठी
११ जून २०२५– गोंदिया शहरातील (रतनारा मंडळ व कुडवा मंडळ)

नागरिकांना आवाहन:-
गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,अधिकाधिक लोकांनी या शिबिरात उपस्थित राहावे आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घ्यावा. हे शिबिर पूर्णतः मोफत असून,पात्रतेनुसार तात्काळ लाभ देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. सुनील केलनका – 9326006220
श्री. छत्रपाल तुरकर – 9423672178
सौ. चैताली नागपुरे – 9518720823
श्री. संदीप तुरकर – 99601 17000
श्री. ललित तावडे – 74980 78312
श्री. मुकेश लिल्हारे– 88887 29090
श्री. ऋषिकांत साहू – 99234 34072
श्री. विवेक मिश्रा – 90287 75841

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

जनतेच्या आमदाराचा ५५ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा —५५ दिव्यांगांना ई-रिक्षा भेट,५५ जणांनी केलं रक्तदान,५५ जणांना दिल्या कानाच्या मशीन,हजारो लोकांची उपस्थिती, शुभेच्छा देताना वही,पुस्तके आणि झाडांची दिली भेट

महाराष्ट्रात सर्वप्रथम गोंदिया तालुक्यात ६५० लाभार्थ्यांना वितरित झाले १३०० ब्रास वाळूचे रॉयल्टी पास सामान्य नागरिकांना दिलासा,प्रक्रियेत सुधारणा आणि प्रशासनाच्या कार्यकुशलतेचे उत्कृष्ट उदाहरण

जनतेच्या आमदाराचा ५५ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा —५५ दिव्यांगांना ई-रिक्षा भेट,५५ जणांनी केलं रक्तदान,५५ जणांना दिल्या कानाच्या मशीन,हजारो लोकांची उपस्थिती, शुभेच्छा देताना वही,पुस्तके आणि झाडांची दिली भेट